मी ठाणे शहरातील निर्मलादेवी महिला मंडळ, बचतगटाची संचालिका श्रीमती सोनी गिरीश जोशी. सन 2007 या वर्षी 7 महिला सदस्य मिळून ठाणे महानगरपालिकेत नोंदणी करुन आम्ही बचतगटाची स्थापना केली. खासगी बँकेकडून कर्ज घेऊन जेवण बनविण्यासाठी गॅस चुला, कढई, मोठे पातेले, झारा, कलथा, भाजीपाला इत्यादी साहित्य खरेदी केले. महानगरपालिका शाळेतील अंगणवाडीत 700 विद्यार्थ्यांना खिचडीचा पुरवठा व इयत्ता 1 ली ते 10 वी या वर्गातील विद्यार्थांना शाळेत पोषण आहार या योजनेत 2000 विद्यार्थांसाठी जेवणाचा ठेका मिळाला. याद्वारे या महिला बचतगटाची प्रगती होऊन आर्थिक आलेख उंचावत गेला.
बातम्या पाहत असताना महाराष्ट्र शासनाकडून गरीब आणि गरजू यांच्या आहाराकरिता अगदी अत्यल्प दरात शिवभोजन जेवणाची थाळी या संदर्भातील योजना पाहिली. योजनेसंदर्भात बचतगटाच्या महिलांबरोबर चर्चा केली.
या योजनेसाठी उप नियंत्रण शिधावाटप कार्यालय फ परिमंडळाचे उपनियंत्रक अधिकारी यांना भेटून बचतगटाच्या माध्यमातून शिवभोजन योजनेत पुरवठादार म्हणून सहभागी होण्याच्या नियम व निकषांची माहिती घेतली. विहित नमुन्यातील अर्ज भरुन कागदपत्रांची योग्य मुदतीत पूर्तता करुन दिली. योजना बचतगटाच्या नावे मंजूर झाली. ठाण्यातील निर्मला मंडळ, गाळा नं.3078/28,संजीवनी विद्यालयाशेजारी, मुकुंद कंपनील जवळ, ईश्वर नगर, कळवा पूर्व केंद्र सुरु करण्यात आलं. शासनाच्या नियामाप्रमाणे 5/- रुपये थाळी (2 चपात्या,1 वाटी भाजी, भात, वरण,) समाविष्ट करुन 200 व्यक्तीना जेवण देणं सुरु झालं.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात मजूर, स्थलांतरीत, बेघर, तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी नागरीकांना या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळाला.
लाभार्थी : श्रीमती सोनी गिरीश जोशी
०००