मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालनालयाचे संचालक संतोष वॉरिक यांची विशेष मलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून अग्निशमन सेवेच्या कार्यपद्धतीपासून ते आपत्ती व्यवस्थापनातील योगदानापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर श्री. वॉरिक यांनी संवाद साधला आहे.
ही विशेष मुलाखत बुधवार, दि. 30 व गुरूवार दि. 31 जुलै 2025 रोजी तसेच शुक्रवार दि. 1 व शनिवार, 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वतयारी, तत्काळ प्रतिसाद आणि पुनर्बांधणी ही तीन मूलभूत तत्त्वे केंद्रस्थानी ठेवत, महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभाग नैसर्गिक आपत्ती, आगीचे प्रकार, रस्ते अपघात व तत्सम संकटांमध्ये नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अविरत कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीतील अग्निशमन सेवांची भूमिका, फायर सेफ्टी ड्रिल्स, सुरक्षाविषयक जनजागृती, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा महत्त्वाच्या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून संचालक श्री. वॉरिक यांनी उपयुक्त माहिती दिली आहे.
०००