पिंपळस ते येवला पर्यायी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांनी केली येवला ते पिंपळस रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी

नाशिक ,दि.२२ जून :-पिंपळस येवला या रस्त्याचे चौपदरी काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथून वाहनांची येजा करण्यासाठी जो पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात येऊन वाहतूक सुरळीत करावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून ५६० कोटी रुपयांचा निधीतून पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असून मंत्री श्री.भुजबळ यांनी या कामाची आज निफाड परिसरात पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.