मुंबई, दि. १० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
मंत्री शिरसाट म्हणाले, वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही वाढ अत्यंत आवश्यक होती. या निर्णयामुळे जात पडताळणी कार्यालये, बार्टी मुख्यालय, उपकेंद्रे तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ या मागणीवर समाधानकारक तोडगा निघाला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी असल्याची भावना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त करुन सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांचे आभार मानले आहेत.
0000