मुंबई, दि. २ : औषध निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून बायकॉन लिमिटेड महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक आहे, ही स्वागतार्ह बाब असून यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित “वेव्हज २०२५ दृकश्राव्य मनोरंजन समिट मध्ये “बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती किरण शॉ मुजुमदार यांच्या समवेत आयोजित भेटी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात राज्य शासनाचे अधिकारी बायकॉन व्यवस्थापन समितीसोबत प्राथमिक चर्चा करतील. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने बायकॉनला सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी औषध उत्पादन निर्मितीमध्ये बायकॉन गुंतवणूक करायला उत्सुक आहे. इन्सुलिन निर्मिती मध्ये लवकरच बायकॉन जगातील अव्वल कंपनी होणार आहे. या दृष्टीने बायकॉनला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची असून पुणे परिसरात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असल्याचे किरण शॉ मुजुमदार यांनी सांगितले.
****
वंदना थोरात/विसंअ/