नाशिक, दि.11 ऑगस्ट, 2025 : नाशिकमध्ये औद्योगिक विकासाला चालना देतानाच आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
निमा हाऊस येथे भेटीदरम्यान आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, निमा सल्लागार बोर्डचे चेअरमन संतोष मांडेलचा, सहसचिव किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, लघु भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, राजेंद्र अहिरे उपस्थित होते.
या बैठकीत उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी उपस्थित अधिकारी, उद्योजक व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ड्रायपोर्टचा प्रश्न केंद्र सरकारच्या आखत्यारितला असून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशकात डिफेन्स हब व इलेक्ट्रिकल क्लस्टर होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले
000