विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी

मुंबई, दि.9 : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ रोजी वितरण करण्यात येणार आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ५२ कामगारांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री  अॅड.आशिष जयस्वाल, सर्व स्थानिक खासदार व आमदार, तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे मंगळवार दि.१३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रदान करण्यात येणारे पुरस्कार सन २०२३ मधील असून छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना कामगार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच राज्यभरातील ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कार्थींना प्रत्येकी रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

नोकरी करत असतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते, अशी माहिती कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे.

पुरस्कारार्थींची नावे – 

कामगार भूषण पुरस्कार :

श्रीनिवास कोंडिबा कळमकर, मल्टिस्कील ऑपरेटर, बजाज ॲटो लिमिटेड, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर.

 

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार  :

१) नेहा विलास भांडारकर, भारतीय आर्युविमा महामंडळ, नागपूर,

२) महेश मधुकर सावंत-पटेल, सीमेन्स लिमिटेड,ठाणे-बेलापूर रोड, ठाणे

३) चंद्रकांत महादेव कांबळे, बजाज ॲटो लिमिटेड,वाळूज, छत्रपती संभाजीनगर

४) दादासाहेब सुरेंद्र भंडे, स्कोडा ॲटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.,छत्रपती संभाजीनगर

५) नरेंद्र शंकर गोखले, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड,  थळ, ता.अलिबाग, जि.रायगड.

६) विजय रामेश्वर बोराडे, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खामगांव, जि.बुलडाणा

७) सचिन लक्ष्मण पिंगळे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय,  बुलडाणा

८) संदीप सतीश रांगोळे, टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड, पिंपरी, पुणे

९) उमेश रामचंद्र फाळके, टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड, पिंपरी, पुणे

10) राजकुमार गुलाबराव किर्दत, अल्फा लावल इंडिया लिमिटेड,सातारा

11) नामदेव रामसा उईके, सी.आय.ई. ॲटोमोटिव्ह इंडिया कास्टींग लि.,  उर्सेगांव, ता.मावळ, जि.पुणे

12) निमीषा नितीन मोहरीर, भारतीय जीवन बिमा निगम, नागपूर

13) दिगंबर शंकरराव पोकळे, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरुड, पुणे

14) दत्तात्रय सुखदेव दगडे, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि., निघोजे म्हाळुंगे खराबवाडी, ता.खेड, चाकण, पुणे

15) संजय जयसिंग देशमुख, थरमॅक्स लिमिटेड, चिंचवड, पुणे

16) विकास चंद्रकांत धुमाळ, महाराष्ट्र स्कुटर्स लि., सातारा लि.आकुर्डी, पुणे

17) बद्रिनाथ शिवनाथ भालगडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिल्लोड, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर

18) प्रविण बबन जाधव, गोदरेज ॲण्ड बॉईज, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.,शिंदेवाडी, शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा

19) मनोज अनंत पाटील, टाटा स्टील लिमिटेड, एम.आय.डी.सी., तारापूर, जि.पालघर

20) सुनिता रविंद्र परमणे, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, पोफळी, ता.चिपळूण, जि. रत्नगिरी

21) प्रकाश बाबुराव चव्हाण, टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेड चिखली, पुणे

22) शिवराज दादासो शिंदे, प्रिमियम ट्रांन्समिशन प्रा.लिमिटेड,चिंचवड, पुणे

23) कविता नरेश भोसले, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय, वडाळा (पूर्व), मुंबई

24) मनोज देविदास गवळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे

25) रविंद्र बाबाजी जाधव, विचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि., कांदिवली (प), मुंबई

26) मारोती सदाशिव पिंपळशेंडे, चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,ऊर्जानगर

27) साखरचंद मारुती लोखंडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे

28) देविदास पंडीत पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे

29) किसन दामोधर नागरकर,महाराष्ट्र राज्य विद्दुत पारेषण कंपनी मर्यादित बल्लारशाह

३०) रविंद्र किसनराव रायकर, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरुड, पुणे

31) वंदना अशोक मनपे, चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, ऊर्जानगर, चंद्रपुर

32) विवेक सर्जेराव रावते, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, इस्लामपुर,ता.वाळवा, जि.सांगली

33) देवकी ओमप्रकाश कोकास, बिल्ट पेपर ग्राफिक्स प्रॉडक्ट लिमिटेड, बल्लारपूर, पेपर मिल्स, चंद्रपूर

34) एकनाथ रमेश उगले, थरमॅक्स लिमिटेड, चिंचवड, पुणे

35) राजेंद्र ज्ञानदेव कांबळे, दि कराड को-ऑप.बँक लिमिटेड, कराड

36) संजय दगु गोराडे, किमप्लास पाईपिंग सिस्टीम प्रा.लिमिटेड,अंबड, नाशिक

37) नितीन आनंदराव देडगे, वनाझ इंजिनिअर्स लिमिटेड, कोथरुड, पुणे

38) सुनिल गुंडू दळवी, विभाग नियंत्रक यांचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर

39) पोपट चंदु रसाळ, स्टरलाईट टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर

40) अजित अनंत कामतेकर, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, ता.अलिबाग, जि.रायगड

41) गुणवंत वसंतराव भारस्कर, महाराष्ट्र राज्यफ विद्युत वितरण कंपनी लि., वाशिम

42) नंदकुमार साहेबराव पाटील, गोदरेज ॲण्ड बॉईज मॅ.कंपनी लिमिटेड, फिरोजशहा नगर, विक्रोळी, ठाणे

43) संजय दिनकर चव्हाण, किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड, खडकी, पुणे

44) सचिन मारुती पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे आगार, जि.ठाणे

45) विजय काशीराम नंदागवळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर रोड, भंडारा

46) भारत गोरख मांडे, केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, माळेगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक

47) शिवाजी नागनाथराव राऊत, मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,वाळुज, छत्रपती संभाजीनगर

48) अमोल अशोक आळवेकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,  कोल्हापूर आगार, जि. कोल्हापूर

49) दिपक वसंतराव पाटील, हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड,ओझर (मिग), ता.निफाड, जि. नाशिक

50) विलास मोरेश्वर पंचभाई, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेड, सातपूर नाशिक

51) अनंत अशोक शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जळगाव