अहिल्यानगर, दि. ६ :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्रीपरिषदेच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.
यावेळी पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांनी यातील पहिला अल्बम मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.