मुंबई, दि. ०३: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार, ४ मे २०२५ रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी मुंबईच्या बाहेरील आहेत आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर विनाअडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार ४ रोजी कोणताही मेगा ब्लॉक ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने ४ रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक नसल्याचे कळविलेले असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
नीट परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/ या लिंकवरून रेल्वेचे वेळापत्रक पाहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.
०००