परभणी दि. 01 (जिमाका) : राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र्य निर्माण करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखडा या उपक्रमाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी येथील इमारतीत स्थापित करण्यात आलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.के.भोजने, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी.एम.लांडे आदी उपस्थित होते.
0000