मुंबई, दि. २६ – ‘महाराष्ट्रातील जैव विविधता व राज्य मानके’ या विषयावर अतिशय प्रेक्षणीय असा चित्ररथ सुमधुर संगीताच्या साथीने राजपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. यावर्षी ऑनलाइन मतदानाने चित्ररथाला पुरस्कार देण्यात येणार आहे. आपण आपले मत नोंदवून या चित्ररथाला जिंकवू शकता. महाराष्ट्राला आतापर्यंत १७ टक्के मते मिळाली आहेत तर उत्तर प्रदेशला २२ टक्के मते मिळाली आहेत. ३१ जानेवारीपर्यंत मत नोंदविता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
मत नोंदविण्यासाठी प्रथमत: https://bit.ly/3AySBOZ या लिंकवर क्लिक करून तीन पैकी एका प्रकारे नोंदणी करा.
त्यानंतर https://t.co/4fUv5cuHHe या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.
मत नोंदविण्याची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी खालील छायाचित्र पाहा आणि त्या क्रमाने आपले मत नोंदवा.