मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणात अटक केली. आरोपींनी चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वजावट घेतल्यामुळे शासनाची महसूल हानी झाली. न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
कारवाईदरम्यान व्यापाऱ्याने चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट वजावट केल्यामुळे शासनाची महसूल हानी झाल्याचे आढळून आले. राज्यकर सहआयुक्त संजय पवार आणि उपायुक्त स्वप्नाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पाटील, शरदचंद्र पोहनकर, भूपेन्द्र वळवी, मनोहर कनकदंडे यांनी ही कारवाई केली.
संबंधित आरोपी करदात्याची कृती महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ व संबंधित नियमांचे सरळ उल्लंघन आहे. अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपींना ०४ सप्टेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग आधुनिक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून व इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सतत लक्ष ठेवत आहे.
0000
किरण वाघ/विसंअ