मुंबई, दि. १५ : कॉटन असोसिएशन इंडियातर्फे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, हॉटेल ग्रीन स्टेशन, मुंबई येथे भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागांमधील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे सर्व संचालक विनय कोठारी, सुधीर मंत्री, श्याम मखारीया, पंकज नेपाणी, पंकज बंगडीवाला, मनीष डागा, मनीष शहा, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भामरे, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी दिलीप हरी पवार, आनंदा चिन्ह, आबा मगन शिंपी, ईश्वर आत्माराम माळी, धनराज त्र्यंबक माळी, ज्ञानेश्वर संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय घेत असून शेतकऱ्यांना जे सहकार्य करता येईल ते करत असतो.
यावेळी भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.
000