‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची ‘महाॲग्री एआय धोरण’याविषयी विशेष मुलाखत

मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाॲग्री एआय धोरण’चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खाली दिलेल्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. कृषी विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

कृषी विभागाने “महाॲग्री एआय धोरण २०२५-२९” नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अन्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर कसा करण्यात येणार आहे, धोरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार आहेत, या धोरणाचा उद्देश, स्वरूप, ‘विकसित भारत २०४७’ सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत असलेले धोरणातील उपक्रम, राज्यात या धोरणाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

000