नागपूर, दि. १५: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सावनेर शहरातील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सावनेर शहरातील एकूण 23 ठिकाणी 91 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
यावेळी खासदार शामकुमार बर्वे, आमदार आशिष देशमुख, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हात सर्वप्रथम सावनेर या शहरात सीसीटीव्हीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात येत्या काळात सीसीटीव्ही लावण्याचा मनोदय आहे. सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर असल्यास नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.
प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशिष देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. आभार अपर पोलीस अधीक्षक नरेश मस्के यांनी मानले.
०००