नाशिक, दि.१५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व संरक्षणासाठी गृह विभाग महत्त्वाचे काम करत असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून या विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होण्यास होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या 150 दिवस सुधारणा कायक्रम अंतर्गत नाशिक परिक्षेत्र पोलिस दलासाठी विकसित सॉफ्टवेअर व कार्यालय सुशोभीकरण उद्घाटन सोहळा प्रसंगी जलसंपदा मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी यावेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस अधीक्षक (ग्रामीण) बाळासाहेब पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले की, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागली आहे.आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी खालील प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला
टास्क मॅनेजर अॅल्पिकेशन – पोलीस विभागातील कार्यांचे नियोजन, कार्यप्रवाह आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त डिजिटल साधन.
व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टिम – कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची नोंद, ओळख व प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व सुरक्षित करणारी प्रणाली.
ई-डेली क्राईम रिपोर्ट्स – गुन्ह्यांची दैनंदिन माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून विश्लेषणासाठी सुलभ करणारी प्रणाली.
यासोबतच पोलीस आयुक्त नाशिक कार्यालयाचे नवीन शासक नव्हे सेवक या संकेतस्थळाचे उद्घाटनही मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. कराळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शुभारंभ झालेल्या तीनही ॲप्सची माहिती व कार्यप्रणाली विषद केली.
000000