सिंधुदुर्गनगरी दिनांक १५(जिमाका) :- स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
तिलारी घाटात आयशर ट्रक दरीत कोसळून अपघात झाला होता. यावेळी पो. कॉ. विजय जाधव व किरण आडे यांनी स्थानिक रहिवाशी रोहित नाईक व सुरज बाळू पवार यांच्या साथीने दरीत उतरून आयशर चालक शशीकुमार व क्लीनर विजय मनगुप्ते यांना तात्काळ बाहेर काढले व वैद्यकीय उपचाराकरिता चंदगड येथे पाठवून त्यांचा जीव वाचविला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटक निवास, तारकर्ली ता. मालवण येथील समुद्रात काही युवक पर्यटक बुडत असल्याचे कळताच क्षणी MTDC चे पर्यटन अधिकारी, पर्यटक निवास, इसदा स्कूबा डायविंग सेंटर तारकर्लीचे कर्मचारी यांनी बुडत असलेल्या युवकांचा जीव वाचविला. दिपक भूपाल माने, प्रादेशिक अधिकारी, गणपत लक्ष्मण मोंडकर, तारकर्ली, श्रीम. वैषाली संतोष कुंभार, स्कुवा प्रशिक्षक इसदा, विजय अरविद टक्के तारकर्ली यांना गौरविण्यात आले.
नवसाक्षर अभियान
नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान मुल्यमापलन चाचणीत देशपातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 99.49 टक्के लागला. 15 वर्ष व त्यापुढील वयोगटातील या परिक्षेतील नवसाक्षरांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
श्रीम. वंदना वामन पारकर, जिप प्रा. शाळा पडवे, श्रीम. निर्मला भाऊ कावले, जिप ओसरगाव कानसळी, श्रीम. जयश्री हनुमंत कलकुटे न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस, श्रीम. सुगंधा अर्जुन पेडणेकर जिप प्रा. सुकळवाड, श्रीम, अनिता अनिल गरुड जिप प्रा. सुकळवाड
गुणवंत विद्यार्थी
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी च्या परीक्षेमध्ये राज्यात गुणवत्ताधारक ठरलेल्या जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कु. पारस देवदास दळवी, कलंबिस्त इंग्लिश स्कुल कलंबिस्त, कु. यशश्रभ गुरुनाथ ताम्हणकर, ॲङ गुरुनाथ कुलकणी न्यू इंग्लिश स्कुल मलागाव.
अवयव दान
जनतेमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने नेत्रदान केलेल्या दात्यांच्या नातेवाईकांना गौरविण्यात आले.
प्रमोद देसाई, रामचंद्र जगताप, गणेश परब, श्याम पेडणेकर, तसेच श्रीम. वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे रा. खारेपाटणी यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर येथे अवयव दान केले आहेत. त्याचे नातेवाईक राजेद्र ब्रम्हदंड यांना सुध्दा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
विनाअपघात 25 वर्षे सेवा
राज्य परिवहन सेवेत 25 वर्षे विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
कणकवली आगार – मुकुंद श्रीराम लाड, सुनिल वासुदेव तारी, सुभाष धोंडू घाडीगांवकर, संदिप हरिश्चंद्र शिरोडकर, अजित यशवंत राणे. विजयदुर्ग आगार- राजेंद्र जगन्नाथ खानविलकर, रत्नाकर संभाजी राणे, सावंतवाडी आगार- अरूण मारूती सरदेसाई, रघुवीर पांडुरंग नाईक
जलतरण खेळ
श्रीम. पूर्वा संदिप गावडे, जलतरण या क्रीडा प्रकारात आजपर्यंत केलेल्या अत्युच्च कामगिरीसाठी गौरवपूर्वक सन्मानित करण्यात आले.
स्काऊट गाईड
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्यपुरस्कार शिबिरात जिल्ह्यातील स्काऊट, गाईड यांनी भाग घेऊन राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे. याबाबत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पात्रता धारकांना मिळते, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कु. लियोन पिंटो, कु चैतन्य वेंगुर्लेकर, जिगीष सावंत, कु. जिग्निष सावंत, कु अनिकेत काळे, मयुरेश काळे.
सफाई कर्मचारी यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक
कसई – दोडामार्ग येथील सौ. सोनाली आपा देसाई यांचेकडून अनावधानाने पडलेले सोन्याचे मंगळसूत्र प्रताप राऊळ (कसई दोडामार्ग नगरपंचायत) सुनिल आरोसकर (कसई दोडामार्ग नगरपंचायत) या सफाई कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आले.
शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजुरी पत्र (किसान क्रेडिट कार्ड)
विनोद विश्वनाथ आळवे, सुकळवाड, महेश रामा जुवेकर, सुकळवाड, सुरेश भगवान सावंत, ओरस, जीवन दत्ताराम केसरकर, माडखोल, ज्ञानेश कोचरेकर, कुडाळ, अनिल दाभोळकर, वेंगुर्ला, सुनिल लोट, कुडाळ,
मौजे आंबोली, गेळे व चौकुळ ता. सावंतवाडी येथील कबुलायतदार गावकर जमिनी हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांनी केलेल्या आदेशानुसार प्रातिनिधीक स्वरूपात गेळे सरपंच सागर ढोकरे यांना आदेशाचे वितरण करण्यात आले.
वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेती संरक्षण शस्त्र परवान्यांची परवानगी प्रक्रीया जिल्हा प्रशासनातर्फे नियमित केल्या जाते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिल्या जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पात्र नवीन तसेच मृत पररवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण करण्यात आले.
00000