मुंबईत १८ ऑगस्ट रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’

पीडित महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम

मुंबई, दि. १४ : महिलांना आपले प्रश्न व तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ‘महिला लोकशाही दिन’ जिल्हास्तरावर साजरा केला जातो. यंदा हा उपक्रम १८ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.

या दिवशी समस्याग्रस्त व पीडित महिलांना शासकीय यंत्रणेकडून तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुलभ मार्गदर्शन व साहाय्य मिळणार आहे. इच्छुकांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यात भरून, आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई ४०००१८ येथे सादर करावेत.

न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्याबाहेरील किंवा अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. महिला व बाल विकास विभागाने सर्व महिलांना लोकशाही दिनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/