मुंबई – गोवा महामार्गावरील गॅस टँकर उलटण्याच्या दुर्घटनेत जीवितहानी नाही

सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा

मुंबई, दि. ०४: मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गॅस टँकर उलटण्याच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम)च्या वतीने कळविण्यात आले आहे.

महामार्गावरील हातखंबा पुनर्रचना विभागात आज सकाळी 9.30 वाजता गॅस टँकर अतिवेगामुळे उलटला. या दुर्घटनेबाबत प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. टँकरजवळ उभ्या असलेल्या लहान चहाच्या स्टॉलवर (टपरी) आणि तेथील 3-4 दुचाकींवर तो उलटला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तेथील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. कंत्राटदार कंपनी कडून पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व यांत्रिक मदत पुरवली आहे आणि टँकर उचलण्याचे काम सुरू आहे,

०००

किरण वाघ/ वि.सं.अ/