१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा   ८ व ९ मे , २०२५ रोजी  नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह सदस्य ॲनी जॉर्ज मॅथ्यू, डॉ मनोज पंडा, डॉ सौम्या घोष, सचिव रित्विक पांडे,सहसचिव राहुल जैन, संचालक मनीष कुमार, उपसंचालक अजित कुमार रंजन, सह  संचालक कुमार विवेक, उपसंचालक संदीप कुमार, सहायक संचालक आंनद कुमार सिंग, सुमीत सिंग कंवल यांचा आयोगाच्या पथकात सहभाग आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यात आयोग  सह्याद्री अतिथीगृह येथे स्थानिक स्वराज्य संस्था व विविध लोकप्रतिनिधी, यंत्रणा, इतर संबंधित यांची भेट घेणार आहेत.

या दोन दिवसीय दौ-यासंदर्भात वित्त विभागाद्वारा सर्व तयारी करण्यात आली असल्याचे विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ