मुंबई, दि. ०३ : लघुपट हे मनोरंजनाचे माध्यम नाही तर सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना आणि विचार प्रभावी मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे,असे मत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज यांनी व्यक्त केले.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या चर्चासत्रात ते बोलत होते.
दिग्दर्शक गुज़ म्हणाले की, सामजिक जीवनात आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवातून प्रत्येकाच्या मनात एक लघुपट (शॉर्ट फिल्म) तयार असतो, फक्त त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज असते. डिजिटल माध्यमामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.आजच्या तरुण कलावंतांमध्ये लघुपट निर्मितीकडे अधिक कल वाढला आहे. लघुपटाचे यश विषयापेक्षा त्यामागील भावना आणि आशय प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात असते असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर लघुपट दाखविण्यात आले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/