विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य

१८ टिप्पण्यामुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, उद्योग, उर्जा व कामगार, ग्रामविकास, गृहनिर्माण, सहकार, पणन व वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृद व जलसंधारण या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

 तालुका तिथे म्हाडा

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, ‘तालुका तिथे म्हाडानिर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तालुक्यांमध्ये म्हाडामार्फत 200 घरे बांधण्यात येतील. यासंदर्भात निर्णय झाला असून प्रत्येक तालुका हा म्हाडाच्या कार्यकक्षेखाली आणला जाईल, असे ते म्हणाले.

प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांसाठी भरीव तरतूद

जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील म्हणाले की, जिगावच्या प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जलसिंचनाचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रथमच मोठी आर्थिक तरतूद केली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह इतर ठिकाणचे प्रलंबित जलसिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील, असे ते म्हणाले. 

यासंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये सदस्यांनी मांडलेल्या विविध मागण्या, प्रस्ताव, सूचना यांची नोंद घेण्यात आली असून सर्व मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी दिली. विभागाचा अर्थसंकल्प मान्य करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर बहुमताने  या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

१८ टिप्पण्या

 1. राज्यतिल महसुल विभगतिल कोतवाल यांचि चतुर्थ श्रेणी मागनी पूर्ण करावि हि विनती

  उत्तर द्याहटवा
 2. कोतवालांच्या मागणीकडे पण लक्ष द्यावे व त्याची मागणी पूर्ण करावी ही विनंती

  उत्तर द्याहटवा
 3. महसुल मंत्री सर आपणांस विनंती कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळून द्यावी ही विनम्र विनंती.

  उत्तर द्याहटवा
 4. कोतवालांना न्याय देऊन उपकृत करावे हि नम्र विनंती

  उत्तर द्याहटवा
 5. महसूल विभागातील शेवटचा कणा व महत्त्वाचा घटक म्हणजे कोतवाल गाव पातळीवरील सर्व माहिती शासनास पुरविणारा कर्मचारी असताना व चोवितास कामावर राहणारा असतांना त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे आणि त्याचा मोडका तोडका संसार अत्यंत दुःख स्थितीत चालवत आहे त्यांच्या मागण्या कडे थोडे लक्ष्य असू द्या

  उत्तर द्याहटवा
 6. कोतवाल यांना किमान वेतन आयोगाच्या निकषानुसार वेतन द्यावे

  उत्तर द्याहटवा
 7. कोतवालाची मुख्य असलेली चतुर्थ श्रेणी ची मुख्य मागणी पूर्ण करावी ही विन्नती साहेब🙏

  उत्तर द्याहटवा
 8. 24 तास शासनाच्या सेवेत राहून काम करणाऱ्या कोतवालास फक्त साडेसात हजार रुपये मानधन आधुनिक भारतात गुलामगिरी रित्या साडेसात हजार रुपये महिन्यात वर कोतवाला कडून वाटेल ते काम महसूल प्रशासन करून घेत आहे आजची कोतवाल सुशिक्षित असल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागात व इतर ठिकाणी काम करण्यास भाग पाडत आहे तरी त्यांना फक्त आणि फक्त 7500 रुपये मानधन मिळतात त्यातून त्यांची उपजीविका होत नाही म्हणून माझी शासनास विनंती आहे की त्यांना कमीत कमी चतुर्थ श्रेणी चा दर्जा तरी देण्यात यावा कोतवाल आपले सदैव ऋणी राहतील

  उत्तर द्याहटवा
 9. कोतवाल कर्मचारी यांची मुख्य मागणी चतुर्थश्रेणी ची आहे लवकरात लवकर चतुर्थश्रेणी देण्यात यावी कोतवाल कर्मचारी यांच्याकडून कामे करून घेतली जातात याची लिस्ट खूप मोठी आहे पिक पाहणी करणे शिक्षण कर पत्र तयार करणे शेतसारा वसूल करणे शिक्षण कर वसूल करणे पावत्या तयार करणे देणे शासकीय रकमा बँकेमध्ये जमा करणे शासकीय टपाल कार्यालयात देणे नोटीस बजावणे त्या त्याबाबतचा रिपोर्ट देणे पी एम किसान योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे त्यांचे बँक अकाउंट खाते नंबर घेऊन ती माहिती अपलोड करणे किसान क्रेडिट साठी लागणारी कागदपत्रे देणे व त्यांना मार्गदर्शन देणे श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना वृद्धापकाळ योजना कुटुंब अर्थसहाय्य योजना कांदा चाळ योजना इत्यादी अशा अनेक योजनांबाबत माहिती देणे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकांबाबत चे सर्व काम हे कोतवाल कर्मचारी करतात ग्रामपंचायत निवडणुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान केंद्रांवर शिपाई म्हणून नेमणूक केली जाते कोतवाला पूर्णपणे कामे करतो कोतवाल कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून चतुर्थ श्रेणीचा हा प्रश्न प्रलंबित आहे शासनाने चतुर्थ श्रेणी चे पदे ही पूर्णपणे कोतवाल कर्मचारी मधून भरण्यात यावीत कोतवाल हा ग्रॅज्युएट एम एस सी आय टी टॅली इंग्लिश मराठी टायपिंग असे उच्चशिक्षित आहेत कोतवाल कर्मचारी यांच्याकडे गुलाम असलेले कर्मचारी असे पाहिले जातेकोतवाल कर्मचारी यांच्याकडून हिटलर पद्धतीने कामे करून घेतली जातात कोतवाल कर्मचारी यांना सरळ सेवेमध्ये शिपाई कृषिसेवक ग्रामसेवक तलाठी आणि लिपिक या पदावर पाच ते दहा टक्के कोटा देण्यात यावा. 6/ 2/ 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावे. गट ड पदासाठी साठी पात्र सेवा कालावधी पाच वर्षे पूर्ण दहावी उत्तीर्ण वय वर्ष 45 च्या या सर्व कर्मचाऱ्यांना 15000 वेतन देण्यात यावे सेवानिवृत्त कर्मचारी यांना महिन्याला 10 हजार पेन्शन चालू करण्यात यावी
  कोतवाल कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी

  उत्तर द्याहटवा
 10. 24 तास शासनाच्या सेवेत राहून काम करणाऱ्या कोतवालास फक्त साडेसात हजार रुपये मानधन*
  ------------------------------------
  आधुनिक भारतात गुलामगिरी रित्या साडेसात हजार रुपये महिन्यात वर कोतवाला कडून वाटेल ते काम महसूल प्रशासन करून घेत आहे. आजचा कोतवाल सुशिक्षित असल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक विभागात व इतर ठिकाणी काम करण्यास भाग पाडत आहे तरी त्यांना फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये मानधन मिळतात त्यातून त्यांची उपजीविका होत नाही म्हणून माझी शासनास विनंती आहे की त्यांना कमीत कमी चतुर्थ श्रेणी चा दर्जा तरी देण्यात यावा कोतवाल आपले सदैव ऋणी राहतील. आपण आमदारांचे जाणता त्याप्रमाणे आम्हा कोतवालांना न्याय असलेला हक्क चतुर्थ श्रेणी द्यावी.

  उत्तर द्याहटवा
 11. कोतवाल कर्मचारी यांची मुख्य मागणी चतुर्थश्रेणी ची आहे लवकरात लवकर चतुर्थश्रेणी देण्यात यावी कोतवाल कर्मचारी यांच्याकडून कामे करून घेतली जातात याची लिस्ट खूप मोठी आहे पिक पाहणी करणे शिक्षण कर पत्र तयार करणे शेतसारा वसूल करणे शिक्षण कर वसूल करणे पावत्या तयार करणे देणे शासकीय रकमा बँकेमध्ये जमा करणे शासकीय टपाल कार्यालयात देणे नोटीस बजावणे त्या त्याबाबतचा रिपोर्ट देणे पी एम किसान योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे त्यांचे बँक अकाउंट खाते नंबर घेऊन ती माहिती अपलोड करणे किसान क्रेडिट साठी लागणारी कागदपत्रे देणे व त्यांना मार्गदर्शन देणे श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना वृद्धापकाळ योजना कुटुंब अर्थसहाय्य योजना कांदा चाळ योजना इत्यादी अशा अनेक योजनांबाबत माहिती देणे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकांबाबत चे सर्व काम हे कोतवाल कर्मचारी करतात ग्रामपंचायत निवडणुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान केंद्रांवर शिपाई म्हणून नेमणूक केली जाते कोतवाला पूर्णपणे कामे करतो कोतवाल कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून चतुर्थ श्रेणीचा हा प्रश्न प्रलंबित आहे शासनाने चतुर्थ श्रेणी चे पदे ही पूर्णपणे कोतवाल कर्मचारी मधून भरण्यात यावीत कोतवाल हा ग्रॅज्युएट एम एस सी आय टी टॅली इंग्लिश मराठी टायपिंग असे उच्चशिक्षित आहेत कोतवाल कर्मचारी यांच्याकडे गुलाम असलेले कर्मचारी असे पाहिले जातेकोतवाल कर्मचारी यांच्याकडून हिटलर पद्धतीने कामे करून घेतली जातात कोतवाल कर्मचारी यांना सरळ सेवेमध्ये शिपाई कृषिसेवक ग्रामसेवक तलाठी आणि लिपिक या पदावर पाच ते दहा टक्के कोटा देण्यात यावा. 6/ 2/ 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावे. गट ड पदासाठी साठी पात्र सेवा कालावधी पाच वर्षे पूर्ण दहावी उत्तीर्ण वय वर्ष 45 च्या या सर्व कर्मचाऱ्यांना 15000 वेतन देण्यात यावे सेवानिवृत्त कर्मचारी यांना महिन्याला 10 हजार पेन्शन चालू करण्यात यावी
  कोतवाल कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी

  उत्तर द्याहटवा
 12. चतुर्थ श्रेणी नाही मिळाली तरी ठीक आहे पण आम्हाला जगण्यापूरते मानधन तर द्यावे अशी मायबाप सरकार ला विनंती आहे.कमीत कमी 20000 तरी

  उत्तर द्याहटवा
 13. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देऊन न्याय द्यावा ही विनंती

  उत्तर द्याहटवा
 14. कोतवाल कर्मचारी यांची मुख्य मागणी चतुर्थश्रेणी ची आहे लवकरात लवकर चतुर्थश्रेणी देण्यात यावी कोतवाल कर्मचारी यांच्याकडून कामे करून घेतली जातात याची लिस्ट खूप मोठी आहे पिक पाहणी करणे शिक्षण कर पत्र तयार करणे शेतसारा वसूल करणे शिक्षण कर वसूल करणे पावत्या तयार करणे देणे शासकीय रकमा बँकेमध्ये जमा करणे शासकीय टपाल कार्यालयात देणे नोटीस बजावणे त्या त्याबाबतचा रिपोर्ट देणे पी एम किसान योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे त्यांचे बँक अकाउंट खाते नंबर घेऊन ती माहिती अपलोड करणे किसान क्रेडिट साठी लागणारी कागदपत्रे देणे व त्यांना मार्गदर्शन देणे श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना वृद्धापकाळ योजना कुटुंब अर्थसहाय्य योजना कांदा चाळ योजना इत्यादी अशा अनेक योजनांबाबत माहिती देणे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकांबाबत चे सर्व काम हे कोतवाल कर्मचारी करतात ग्रामपंचायत निवडणुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान केंद्रांवर शिपाई म्हणून नेमणूक केली जाते कोतवाला पूर्णपणे कामे करतो कोतवाल कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून चतुर्थ श्रेणीचा हा प्रश्न प्रलंबित आहे शासनाने चतुर्थ श्रेणी चे पदे ही पूर्णपणे कोतवाल कर्मचारी मधून भरण्यात यावीत कोतवाल हा ग्रॅज्युएट एम एस सी आय टी टॅली इंग्लिश मराठी टायपिंग असे उच्चशिक्षित आहेत कोतवाल कर्मचारी यांच्याकडे गुलाम असलेले कर्मचारी असे पाहिले जातेकोतवाल कर्मचारी यांच्याकडून हिटलर पद्धतीने कामे करून घेतली जातात कोतवाल कर्मचारी यांना सरळ सेवेमध्ये शिपाई कृषिसेवक ग्रामसेवक तलाठी आणि लिपिक या पदावर पाच ते दहा टक्के कोटा देण्यात यावा. 6/ 2/ 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावे. गट ड पदासाठी साठी पात्र सेवा कालावधी पाच वर्षे पूर्ण दहावी उत्तीर्ण वय वर्ष 45 च्या या सर्व कर्मचाऱ्यांना 15000 वेतन देण्यात यावे सेवानिवृत्त कर्मचारी यांना महिन्याला 10 हजार पेन्शन चालू करण्यात यावी
  कोतवाल कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी

  उत्तर द्याहटवा
 15. महसुल विभागाचा पाया समजला जाणारे राज्य भरातील साडे १२ हजार कोतवाल कर्मचारी सध्या अत्यंत तुटपुंज्या ७५००₹ मासिक मानधनावर ‌कार्यरत आहेत .पैकी ५ ते ६ हजार कोतवाल कर्मचारी हे पदवीधर आहेत.
  कोतवाल कर्मचारी यांच्या वर्षानुवर्ष शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या पैकी एक प्रमुख मागणी ही आहे की,
  *पदवीधर कोतवाल कर्मचाऱ्यांमधुन तलाठी पदी पदोन्नती ने 25% पदे भरावीत.*
  सय्यद समद
  आष्टी,बीड.
  मो.9881279028

  उत्तर द्याहटवा

Blogger द्वारा समर्थित.