पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

1 टिप्पणी
मुंबई, दि. १० : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत. 

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत. 

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२  बेडस् उपलब्ध आहेत. 


केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर  मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या १२ देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 
000000

पुणे के कोरोना बाधित मरीजों के ३ निकट साथी भी पॉझिटि
पाँच लोगों पर चल रहा है इलाज़
- स्वास्थ्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १० : पुणे के  यात्री गत सोमवार को कोरोना बाधित निदर्शन में आने के बाद उनके निकट साथियों की तलाश जारी है और इसमें मरीज की लड़की और जिस टैक्सी से उन्होंने मुंबई पुणे तक का सफर किया, वह टॅक्सी का चालक और उनके विमान के सहयात्री ऐसे तीन निकट सहवासी भी करोना बाधित मिले है। इसलिए अब पुणे के कोरोना पॉझिटिव मरीजों की संख्या  पर गई है। इन सभी पर इलाज चल रहा है और राज्य में अब ३०९ में से २८९ लोगों की रिपोर्ट कोरोना निगेटीव है, यह जानकारी स्वास्थ्यमंत्री राजेश टोपे ने आज दी।
दरनिया, १० मार्च तक मुंबई, पुणे और नागपु अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे पर अभी तक ११०१ विमान के १ लाख २९ हजार ४४८ यात्रियों की जांच की गई है। ब्युरो ऑफ इमिग्रेशन के द्वारा इराण, इटली और दक्षिण कोरिया से आए हुए यात्रियों की जानकारी राज्य को दी जा रही है। इन तीन देशों में इन दिनों करोना का फैलाव बड़े पैमाने पर होने से २१ फरवरी के बाद इन देशों से आए सभी यात्रियों पर ध्यान दिया जा रहा है। आज तक राज्य में बाधित क्षेत्र से ५९१ यात्री आए है।
१८ जनवरी से बुखार, सर्दी, खांसी के लक्षण दिखाई देने पर राज्य के अलग-अलग विलगीकरण कक्ष में आज तक ३०४ लोगों को भर्ती किया गया है। आज तक भर्ती किए गए लोगों में से सभी २८९ लोगों के प्रयोगशाला के सैंपल  कोरोना निगेटिव है और उमसें ५ पॉझिटिव है। आज तक भर्ती हुये ३०४ यात्रियों में से २८९ लोगों को अस्पताल से छुट्टी दी गई है और उन्हें घर छोड़ा गया है। अभी १२ लोग पुणे में और ३ मुंबई में भर्ती है।
उन्होंने जानकारी में बताया कि  कोरोना विषाणू बीमारी प्रतिबंध और नियंत्रण पूर्वतैयारी के रूप में राज्य में सभी जिला अस्पताल और सरकारी  चिकित्सा महाविद्यालयों में विलगीकरण स्थापन किया गया है और राज्य में विविध विलगीकरण कक्ष में ५०२  बेड्स उपलब्ध है।
केंद्र सरकार की सूचना के अनुसार सभी देशों से आए यात्रियों की जांच हवाईअड्डे की जा रही है और उसमें लक्षण निदर्शन में आने पर ऐसे यात्रियों को विलगीकरण कक्ष में भर्ती किया जा रहा है।  कोरोना बाधित १२ बड़े प्रमाण में फैलाव है उन देशों से आए यात्रियों को अन्य यात्रियों की सूची जानकारी हेतु तथा निगरानी हेतु राज्य के स्वास्थ्य विभाग में दैनंदिन स्वरुप में दी जा रही है।  बाधित क्षेत्र से राज्य में आए कुल ५९१ यात्रियों में से ३५३ यात्रियों का १४ दिनों तक ध्यान रखा गया और यह समय पूरा हुआ है।  इसके अलावा  राज्य नियंत्रण कक्ष - ०२०/२६१२७३९४ ,   टोल फ्री  क्रमांक १०  दिया गया है, इस पर नागरिक संपर्क कर सकते है।
0000

अजय जाधव..१०.३.२०२०

1 टिप्पणी

  1. महाराष्ट्र सरकार युद्ध पातळीवरून करोना प्रतिबंधक उपाययोजना करत आहे ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. आरोग्यमंत्रीही सातत्याने जनतेशी सुसंवाद साधत आहेत. त्यांचे आणि सर्वसंबधित अधिकार्यांचे अभिनंदन. काही व्रुत्तवाहिन्या तारतम्य न बाळगता बातम्या देत आहेत. जनतेने त्याची फार गांभीर्याने दखल न घेता सरकारी पातळीवरील प्रयत्नांंना पाठबळ द्यावे ,असे एक पत्रकार म्हणून मी आवाहन करू इच्छितो. -प्रकाश कुलकर्णी


    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारा समर्थित.