'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'घाबरू नका.. फक्त काळजी घ्या : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळा' या विषयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 13 मार्च  2020 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रक्षेपित होईल. निवेदक संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.


कोरोना या आजाराचे रूग्ण, नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, राज्य व जिल्हास्तरीय यंत्रणांची तयारी, पर्यटकांची केली जाणारी तपासणी, कोरोना या आजाराकरिता करण्यात आलेला विलगीकरण कक्ष, आपत्कालीन यंत्रणांचे संपर्क क्रमांक, कोरोना चाचणीसाठी उपलब्ध प्रयोगशाळा याबाबतची सविस्तर माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.