हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतखटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

मुंबई, दि. 10 :- हिंगणघाट जळीता हत्याप्रकरणाच्या  खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने  चालेल यावर कटाक्ष असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल.

अशा घटनेत तपासात कुचराई होऊ दिली जाणार नाही. पीडिता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी  शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.