आंतरराष्ट्रीय ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 13 : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे स्थापित जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्या सौजन्याने आयोजित भारतीय आंतराष्ट्रीय ज्वेलरी प्रदर्शनाचे आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष प्रमोद कुमार अग्रवाल, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.या प्रदर्शनासाठी जगभरातील सुमारे आठ हजार लोकांनी भेट देण्यासाठी नोंदणी केलेली आहे.  45 हजार चौरस फुटावर आयोजित या प्रदर्शनात 600 प्रदर्शनकर्ते, 1300 बुथ, 18 हजार उद्योजक, 325 शहरे आणि 55 राष्ट्रांनी सहभाग नोंदविला आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल देशभरातील सुमारे साडेसहा हजार जेम्स आणि ज्वेलरी उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.

उद्‍घाटनापूर्वी उद्योगमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. तर शो डेलीया विशेष पुरवणीचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
००००
विसंअ/ अर्चना शंभरकर/ ज्वेलरी प्रदर्शन/ उद्योगमंत्री/13-2-20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.