वुहानमध्ये असलेल्या साताऱ्याच्या तरुणीशी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी साधला संवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 11 : कोरोना विषाणुचा उद्रेक चीनच्या ज्या वुहान प्रांतात झाला तेथे मूळची सातारा येथील असलेली अश्विनी अविनाश पाटील ही तरुणी सध्या अडकली आहे. काल तिने सोशल मीडियावरुन मायदेशी परतण्याच्या केलेल्या आवाहनाची दखल घेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अश्विनीशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. तिला दिलासा देत मायदेशी परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यमंत्री श्री.पाटील यांनी काल चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अश्विनी पाटील हिला सुखरुपपणे मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अश्विनीला लवकरात लवकर मायदेशी आणले जाईल, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

सुमारे दोन आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी भारतात परतले असून त्यांना आणण्यासाठी राज्यमंत्री श्री.पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे विद्यार्थी सध्या निरीक्षणाखाली असून लवकरच त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल. आरोग्य विभागामार्फत त्यांना घरी सोडण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे राज्यमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
००००
अजय जाधव/विसंअ/11.2.2020


चीन के वूहान प्रान्त में अटकी सातारा की युवती से
स्वास्थ्य राज्यमंत्री यड्रावकर ने साधा संवाद

मुंबईफरवरी 11:- कोरोना वायरस चीन के वूहान प्रांत में काफी तेजी से फैला है। वहां पर महाराष्ट्र के सतारा जिले की अश्विनी अविनाश पाटील नामक युवती फिलवक्त अटकी हुई है। कल उसने सोशल मीडिया के माध्यम से अपने देश वापस आने की इच्छा व्यक्त की जिसको प्रतिसाद देते हुए स्वास्थ्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरकर ने अश्विनी से दूरभाष पर संपर्क किया और उसे आश्वस्त करते हुए स्वदेश लौटने के लिए हर संभव प्रयास करने का आश्वासन भी दिया।

इस बीच राज्य मंत्री श्री पाटील ने कल चीन में भारतीय दूतावास से संपर्क कर अश्विनी पाटिल को सुरक्षित तरीके से स्वदेश लाने में सहयोग करने की विनती की। इसके कारण अश्विनी जल्द से जल्द भारत लौटेगी ऐसा आश्वासन भी राज्य मंत्री ने दिया। लगभग दो सप्ताह पहले महाराष्ट्र के 26 छात्र वहा से भारत वापस लौट आए हैं। उन्हें यहां लाने में राज्यमंत्री श्री पाटील ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। यह सभी छात्र फिलवक्त क्वॉरेंटाइन कक्षों में निरीक्षण के तहत रखे गए हैं तथा जल्द ही उन्हें घर जाने के लिए रिहा किया जाएगा। स्वास्थ्य विभाग की ओर से उनको घर छोड़ने की कार्यवाही की जाएगीयह बात भी राज्य मंत्री श्री पटील ने कही।
००००
Minister of state for health interacts with
Satara girl stuck in Wuhan province in China

Mumbai, February 11:- A young girl from the Satara district of the state is stranded in the Wuhan province of China where the Corona virus has created havoc. The girl identified as Ashwini Avinash Patil has yesterday appealed through the social media to help her in returning to motherland. Taking cognizance of her appeal, the minister of state Rajendra Patil Yadravkar contacted Ashwini on telephone and had a word with her. He gave her solace and assured her of all possible assistance in bringing her back to India.

Meanwhile, the minister of state Mr Patil yesterday contacted the Indian Embassy in China and appealed them to extend all possible assistance to Ashwini for returning to India. The Minister assured that Ashwini will soon return to her motherland. 26 students from India returned two weeks ago to Maharashtra and minister of state Mr Patil was instrumental in assisting them in returning to their land. These students are presently kept under observation and will be soon released from Quarantine to go home. The health department will initiate the process for discharging them from hospitals, the minister said.


0000  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.