विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख रुपये आर्थिक मदत - मंत्री विजय वडेट्टीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 12 :  विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख 27 हजार रुपयाची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान 33 टक्के हानी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना 1 हेक्टरच्या मर्यादेत (संबंधित शेतकऱ्याकडे 1 हेक्टरपेक्षा जास्त कितीही शेती असली तरी) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF)/राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) नुसार त्या त्या पिकासाठी/क्षेत्रासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख 27 हजार रूपयांच्या आर्थिक मदतीस मान्यता देण्यात आली आहे. दि. 26 जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले होते. या पूर परिस्थिमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना मदत देण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी 9 कोटी 21 लाख दोन हजार रूपये, वर्धा जिल्ह्यासाठी 36 लाख 71 हजार रूपये, भंडारा जिल्ह्यासाठी 8 कोटी 36 लाख 54 हजार रूपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 20 कोटी 81 लाख 69 हजार रूपये, गडचिरोली जिल्ह्यासाठी 30 कोटी 18 लाख 32 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. यात कोरडवाहू पिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) नुसार एकूण 20 हजार 400 रूपये प्रति. हेक्टर, आश्वासित सिंचनाखालील पिकांना 40 हजार 500 रूपये प्रती. हेक्टर तर बहुवार्षिक पिकांना 54 हजार रूपये प्रती. हेक्टर अशी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. 
000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/12.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.