महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत सिंचन प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा आढावा घेण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 3; महाराष्ट्र विकास महामंडळामार्फत सिंचन प्रकल्पासाठी वापरल्या जाणा ऱ्या , त्याचप्रमाणे सिंचन प्रकल्पाव्यतिरिक उपलब्ध असलेल्या जमिनींचा आढावा घ्यावा, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.  राज्यातील विविध तालुक्यातील सिंचनाच्या मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीत लोकप्रतिनीधींनी आपल्या क्षेत्रातील मागण्यांवर चर्चा केली. माढा तालुक्यातील मौजे बावी, तुळशी अंबाड , शिराळा (मा), पिंपळखुंटे, कुर्डू या गावांचा सीना माढा  उपसा सिंचन योजनेत समावेश करणे, योजना वाढीव क्षेत्रास पाणी मिळणे, करमाळा मतदार संघातील कुकडी व उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कामांना गती देणे, दहिगाव उपसा सिंचन योजना-सुप्रमा, भूसंपादन निधी, उर्वरित कामे, कुकडी कालव्याची कामे, सीना नदीवरील को.प बंधारे काम सुधारणा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा) बेंद-ओंढा बाबत पुराचे पाणी शाफ्टमधून उचलणे, कृष्णा मराठवाडा बोगदा पाणी शाफ्टमधून उचलणे, सोलापूर जिल्ह्यातील माढा व पंढरपूर तालुक्यातील भीमा व सीना नदीवरील बुडीत बंधारे बांधणे, इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली.

मंगळवेढा तालुक्यासाठी पाणी देताना त्यात कपात होत गेली. यासाठी कोणत्या निकषांवर निर्णय घेण्यात आले, तसेच बदललेल्या पाण्याच्या मागणीनुसार पाणी वाटप करण्यासाठी आवश्यक तो आढावा घेण्यात यावा तसेच  सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या  35 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची तातडीने बैठक घेऊन अर्थसंकल्पात  निधीची तरतूद करण्यात यावी अशा सूचना श्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीला जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, भारत भालके, कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अंसारी, मुख्य अभियंता वि. ग. राजपूत, अधिक्षक अभियंता धीरज साळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
००००
अर्चना शंभरकर/ विसअ/3/2/20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.