‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


   
मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमात सहकारातून समृद्धीकडेया विषयावर सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी आणि सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
     
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, या कर्जमुक्ती योजनेचा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, जुन्या कर्जमाफी तसेच नवीन कर्जमुक्ती योजनेतील फरक, आपले सरकार सेवा केंद्राची कर्जमुक्तीसाठी कशी व कुठे केंद्र असणार आहेत , साखर कारखान्यांच्या समस्या व उपाय आदी विषयांची माहिती  मंत्री श्री. पाटील यांनी जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.