सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, माढ्याला एमआयडीसी - उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. 12 : सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, करमाळा, केम व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यासाठी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश  उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज मंत्रालयात  आयोजित बैठकीत दिले.

औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहित धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावा, असेही यावेळी कुमारी तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपअभियंता सुनिल चि. कोलप,भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.
000
संगिता बिसांद्रे/12.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.