गृहनिर्माण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नशील - पत्रकार परिषदेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करून या क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.येत्या महिन्याभरात दुबईचे राजपुत्र मुंबईला भेट देणार असून तेही मुंबईच्या गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणुकीस उत्सुक आहेत अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मागील एक महिन्याच्या कालावधीत गृहनिर्माण विभागाने घेतलेले निर्णय व त्याची झालेली अंमलबजावणी आणि परिणाम याबाबत माहिती देण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री श्री.आव्हाड बोलत होते.


मंत्री श्री. आव्हाड म्हणाले, म्हाडामध्ये चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी आणि पोलिसांसाठी प्रत्येकी दहा टक्के घरे आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्य गरीब माणसाच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी गृहनिर्माण विभाग कटिबद्ध आहे.म्हणून 'एसआरए'ला यापुढील काळात 'आसरा' असे संबोधले जाईल व म्हाडा ची ओळख आता 'रोटी, कपडा और म्हाडा' अशी राहील.

मुंबई ही चाळकऱ्यांची आहे, गरिबांची आहे, कष्टकऱ्यांची आहे. त्यांच्या घामातून मुंबई उभी राहिली. या चाळीमध्ये अनेक महापुरुष राहिले. त्यांनी मुंबई व देश घडविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कवी नामदेव ढसाळ, श्रीपाद अमृत डांगे यासारखे अनेक कवी, साहित्यिक चाळ संस्कृतीतून पुढे आले. मुंबई घडविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबईच्या नव्या पिढीला या महापुरुषांची माहिती व्हावी म्हणून गृहनिर्माण विभागातर्फे लवकरच एक कॉफीटेबल बुक तयार करणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन उद्घाटन करण्यात येईल, अशीही माहिती मंत्री श्री. आव्हाड यांनी दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झोपडीधारकांच्या पात्रतेचे संदर्भात एकच केंद्रीय यंत्रणेमार्फत परिशिष्ट दोन तयार करणे, झोपडीत प्रत्यक्षात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला दिलासा मिळेल यासाठी जो प्रत्यक्षात राहतो त्यालाच घर दिले जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या योजनांची तांत्रिक तपासणी जलद गतीने व अधिक पारदर्शकपणे करण्यासाठी ऑटो डीसीआर प्रणाली लागू करण्यात येईल. पुनर्वसन घटक इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत गुणवत्ता कक्षाची निर्मिती करण्यात येईल, भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर योजनेतील प्रकल्पग्रस्त सदनिका एका महिन्याच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे विकासकाला अनिवार्य राहील, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील धार्मिक स्थळांच्या स्थलांतरण याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, पुणे-पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची चटईक्षेत्र निर्देशांक अनुसार असलेली प्रोत्साहन योजना ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच प्रस्तावित मुंबई महानगर प्रदेशाकरिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील एकूण सात महानगरपालिका व आठ नगरपालिका क्षेत्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची तरतूद समाविष्ट करण्यात यावी, प्रस्तावित मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठीच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडी धारकांसाठी पार्किंगची तरतूद समाविष्ट असणार आहे, शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री श्री.आव्हाड यांनी दिली

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक घाटकोपर येथील चिराग नगर मध्ये करण्यात येणार, इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण शुल्क रद्द करण्यात येणार, परळ येथील बीआयटी चाळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते त्या इमारतीचे जतन करून राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यात आला आहे, माहुल मुंबई येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाची गोराई तसेच मागाठाणे बोरीवली येथे गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या 300 घरांचा ताबा महानगरपालिकेला देण्यात आला, म्हाडाच्या पुनर्वसन प्रकल्पातील अतिरिक्त बांधकाम क्षेत्राच्या अधिमूल्यात सवलत, म्हाडाच्या भोगवटा प्रमाणपत्र देण्यामध्ये सुलभता, म्हाडा अभिन्यास मंजुरी 45 दिवसात, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर म्हाडाच्या वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्पांच्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे देण्याचा निर्णय, ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमिनीवर सर्वसमावेशक पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येणार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील म्हाडा वसाहतीतील समूह विकासाचा प्रत्येकी एक प्रस्ताव म्हाडाने शासनास तात्काळ सादर करण्याचा निर्णय झाला, ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर गृहनिर्मिती, कोकण मंडळाअंतर्गत दहा हजार घरांची सोडत काढण्यात येणार यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी यावेळी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.