लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि १५: लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत लातूर ग्रामीणचे तत्कालीन आमदार ॲड. त्रंबक श्रीरंगराव भिसे यांनी विनंती केली होती. त्याला अनुसरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून अहवाल मागविण्यात आला होता.

आता लातूरच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे नाव विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर असे करण्यात येईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.