विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या प्राधिकारपत्रासाठी १७ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबईदि. १० : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य श्री.धनंजय पंडीतराव मुंडे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांनी विधानपरिषद सदस्यपदाचा दि. २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील रिक्त झालेल्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने दि. ३ जानेवारी, २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

या निवडणुकीचे मतदान दि. २४ जानेवारी, २०२० (शुक्रवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व मतमोजणी दि. २४ जानेवारी, २०२० (शुक्रवार) रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे.

या पोटनिवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहीत प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रतिनिधींच्या शिफारसी महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालयमुंबईयांनी दि. 17 जानेवारी, 2020 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमुंबईयांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील पोट निवडणूकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावेआपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतीसह) महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालयमुंबईयांच्याकडे दि. 17 जानेवारी, 2020 पर्यंत पाठवावित. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच दि. 17 जानेवारी, 2020 नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाहीअसे मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्ययांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.