असा होता आठवडा (दि. २९ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा (न्यूज डायजेस्ट)

दि.29 डिसेंबर 2019
·      कल्याण (ठाणे) येथे, कल्याण जनता सहकारी बॅकेच्या न्यासाच्या वतीने आयोजित समाजसेवा पुरस्कार कार्यक्रम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.

दि.30 डिसेंबर 2019
·      राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्याद्वारे श्री. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची आणि 10 सदस्यांना राज्यमंत्री पदाची शपथ. यामध्ये मंत्री म्हणून अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ.राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनिल केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादाजी भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, ॲड. यशोमती ठाकूर, सर्वश्री ॲड.अनिल परब, उदय सामंत, ॲड.के.सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे या मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभूराज देसाई, बच्चू कडू, डॉ.विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, श्रीमती अदिती तटकरे, सर्वश्री संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शपथ.
·       मंत्रालयात पहिली मंत्रीपरिषद संपन्न. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज राज्य मंत्रिमंडळात असून ही एक बेस्ट टीम आहे अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडून भावना व्यक्त.
·      भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 मधील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 8 जानेवारी 2020 रोजी घेण्याचा निर्णय.
·      महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.117 चा दीक्षांत संचलन कार्यक्रम, मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
·      नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इनडोअर फायरींग रेंज, ॲस्ट्रोटर्फ हॉकी व फुटबॉल मैदान तसेच आवेल मैदानातील सिन्थेटिक ट्रॅकचे भूमिपूजन.दि. 31 डिसेंबर 2019
·      अकोट तालुक्यातील (जिल्हा अकोला) शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी  विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभनात बैठक. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना देण्याचे श्री.पटोले यांचे निर्देश.
·      वनेतर क्षेत्रातील भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन 2017 च्या तुलनेत 9831 चौ.कि.मी हून वाढून 2019 मध्ये 10,806 चौ.कि.मी इतके झाले. ही वाढ 975 चौ.कि.मी आहे. वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्राचा देशात पहिला  क्रमांक.
·      सैन्यातील वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर. सैन्य दलातील शौर्यासाठी पारितोषिके देण्यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्काराने एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, ले.जनरल अशोक आंब्रे, ले.कर्नल राजेश हंकारे, ले.कर्नल शशिकांत वाघमोडे या सेनाधिकाऱ्यांचा गौरव.
·      माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकिंग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकिटे/ मालाची घरपोच वाहतूक करणारी कुरिअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना 'कॉमन करिअर' म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून करणे आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक अशी नोंदणी करण्याचे मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन.

दि. 1 जानेवारी, 2020
·      कोरेगांव-भीमा येथील विजयस्तंभास उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्यामार्फत अभिवादन
·      जिल्हा नियोजन समित्यांचे कामकाज दि. 1 एप्रिल 2020 पासून आय-पास (इंटिग्रेटेड) प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम) या संगणकीय प्रणालीद्वारे कार्यान्वित करण्याचा निर्णय.
·      विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठक. मोठ्या प्रमाणात धान खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे अध्यक्षांचे निर्देश.
·      ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासमवेत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची बैठक. राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी थिंक टँक म्हणून पुणे इंटरनॅशनल सेंटरचा उपयोग करण्यासाठी चर्चा.
·      गोदावरी शेतकरी कंपनीच्या दिनदर्शिकेचे कृषिमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन.


दि. 2 जानेवारी, 2020
·      महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात ध्वजप्रदान दिनानिमित्त संचलन. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची उपस्थिती. पोलिसांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन.
·      पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने, मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.
·      'फोर्स वन' या विशेष पोलीस दलाच्या जोगेश्वरी येथील प्रशिक्षण केंद्रास मुख्यमंत्री आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट.
·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याव्दारे दादरस्थित इंदू मिल येथे होत असलेल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक' कामाच्या प्रगतीचा श्री. पवार यांच्याकडून आढावा.
·      रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांचा मंत्री श्री.उदय सामंत यांच्याकडून आढावा.
·      6 फेब्रुवारी 2020 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या सुकवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला, रजवेल आणि शिर्शी या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान; फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी.
·      महाराष्ट्र सायबर, माहिती व जनसंपर्क व स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने सायबर गुन्हे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी 'सायबर सेफ वुमन' मोहीम सुरू. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम.
·      'सायबर सेफ वुमन' मोहिमेत सर्वांच्या सहभागाचे आणि महिला संदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


3 जानेवारी 2020
·      पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.34 टक्के व्याजदराच्या 'महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2020', अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.2 फेब्रुवारी 2020 पर्यंत देय असलेल्या व्याजासह, दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी सममूल्याने करण्यात येईल.
·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा. वेळापत्रकानुसार योजना पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      'स्वच्छ सर्वेक्षण 2020', च्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचा राज्यातील महानगरपालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येण्यासाठी टीम म्हणून काम करण्याचे आणि कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्यस्तरीय प्रकल्प आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची मंत्रालयात बैठक. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश.
·      रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामाबाबत मंत्री श्री.उदय सामंत यांच्याकडून आढावा. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, नळपाणी पुरवठा योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते दुरूस्ती, तिवरे धरण, गणपतीपुळे, नाचणे म्हाडा प्रकल्प, पोलीस गृहनिर्माण, मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास, पर्यटकांसाठी सुविधा, आदी विषयांच्या अनुषंगाने चर्चा.
·      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला, युवतींसाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित सायबर सेफ वुमनमोहिमेस राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद. 34 जिल्ह्यात व 10 आयुक्तालयात एकूण 150 ठिकाणी आयोजित कार्यशाळेत हजारो महिला, महाविद्यालयीन युवती तसेच शालेय विद्यार्थीनींचा सहभाग. इंटरनेट व समाजमाध्यमाचा सुयोग्य वापर करण्याचा संकल्प.
·      मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अँपासेट स्पेशालिटी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने 25 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
·      वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना 31 जानेवारी 2020 पर्यंत मानधनासाठी अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आवाहन. संपर्क : दूरध्वनी क्र. 022-22842670/28422634; -मेल : mahaculture@gmail.com /dcamandhan@gmail.com.
·      यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक 4 फेब्रुवारीला  मतमोजणी .4 जानेवारी 2020

·      भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा आयोजित कॉर्पोरेट कंपनी सचिवांच्या पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत श्री. भगत सिंह कोश्यारी उपस्थित. कंपनी सचिवांनी जीवनमूल्यांवर आधारित काम करण्याचे श्री. कोश्यारी यांचे आवाहन.
·      श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक त्याच दिवशी मतमोजणी.

·      मुख्यमंत्री  श्री.उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाची आढावा बैठक.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      कामगार केंद्रस्थानी ठेऊन औद्योगिक प्रगती साधा ;
·      स्थानिक युवकांना रोजगारक्षम बनविण्यास उद्योगांनी पुढाकार घ्या ;
·      विभागीय स्थितीस अनुसरुन उद्योग सुरू करा ;
·      उद्योगांना सवलतींसाठी आर्थिक गुंतवणुकीबरोबरच रोजगारनिर्मिती हा निकष ठेवा ;
·      मुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र स्थापन करा.

·      महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे दि. 10, 1112 जानेवारी 2020 रोजी आयोजन. संपर्क : 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878
·      वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.
०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.