महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल कुस्तीपटू सदगीर याचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडिअम येथे आज झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या कुस्तीपटू शैलेश शेळके याचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, नाशिकच्या भगूरसारख्या ग्रामीण भागात कुस्तीचे धडे घेतलेल्या सदगीरने महाराष्ट्र केसरीची चांदीची ढाल पटकावून आपले आई-वडील आणि वस्ताद यांच्या कष्टाचे चीज केले आहे. त्याने परिश्रमाच्या बळावर मिळविलेले यश नवोदित कुस्तीपटूंना प्रेरक ठरेल. यापुढेही त्याने अशीच मेहनत घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे व राज्याचा लौकिक सर्वदूर पोहोचवावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.