कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 14 : राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. खासदार श्री.पवार यांचा कृषी क्षेत्राचा अभ्यास आणि त्यांचे योगदान पाहता राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

सकाळी श्री.भुसे यांनी श्री.पवार यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागाचे अधिकाधिक दौरे केले पाहिजे. कृषी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन शेतीच्या विकासासाठी त्याचा योग्य तो वापर करणे, कृषी क्षेत्रात ज्या संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या भेटी घेणे, आदी बाबी श्री.पवार यांनी श्री.भुसे यांना सांगितल्या.
००००
 अजय जाधव/विसंअ/14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.