'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची उद्या मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' व  'दिलखुलास' कार्यक्रमात महालक्ष्मी सरस हक्काचे व्यासपीठ, हक्काची बाजारपेठ या विषयावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 20 आणि मंगळवार दि.21 जानेवारी रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महालक्ष्मी सरस हे ग्रामीण भागातील महिलांसाठीचे मोठे व्यासपीठ आहे.  या प्रदर्शनाचे  विक्री व नियोजन, आयोजनामागचा उद्देश,  महिलांचा आर्थिक आलेख उंचावण्यासाठी काही विशेष नियोजन, महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणारे काही नवीन उपक्रम, जनजागृती, महालक्ष्मी सरस प्रदर्शनास भेट देण्यासाठीचे आवाहन आदी विषयांची माहिती श्री. मुश्रीफ यांनी जय महाराष्ट्र व दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.