कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे विधानपरिषद सभापतींचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 8 :  सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावातील कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी शासनाला दिले.

विधानपरिषदेत सदस्य हेमंत टकले यांनी कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या अपूर्णावस्थेत असलेल्या स्मारकासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी सभापती श्री. नाईक - निंबाळकर यांनी हे निर्देश दिले. सातारा जिल्ह्यातील मंत्री म्हणून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याकामी लक्ष देऊन स्मारकाचे काम पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, शासनाने बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करून कविवर्यांचा यथोचित सन्मान करावा. स्मारक पूर्ण झाल्यावर त्यांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करावा, असेही श्री. नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.

दरम्यान, सभागृह नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करुन दिला.  
००००
श्रद्धा मेश्राम/दि.०८.०१.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.