सावित्रीच्या हजारो आधुनिक लेकींचा ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेत सहभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील महिला, युवतींसाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित केलेल्या सायबर सेफ वुमन मोहिमेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील 34 जिल्ह्यात व 10आयुक्तालयात एकूण 150 ठिकाणी आयोजित कार्यशाळेत हजारो महिला, महाविद्यालयीन युवती तसेच शालेय विद्यार्थीनींनी सहभाग घेतलाआणि इंटरनेट व समाजमाध्यमाचा सुयोग्य वापर करण्याचा दृढ संकल्प केला.           

महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व या संदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी आज एकाच दिवशी राज्यभर सायबर सेफ वुमन मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. या मोहिमेत 12 जिल्ह्यात विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

सायबर गुन्हे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक, लैंगिक अत्याचार, विवाहविषयक वेबसाईटवरून होणारी फसवणूक आदींबाबत महिला व तरुणींना माहिती व्हावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात 150 ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. इंटरनेट वापरताना, फोटो अपलोड करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, महिला सुरक्षाविषयक कायदे या विषयावर सायबर विषयातील तज्ज्ञ, सायबर पोलीस अधिकारी, महिला दक्षता समिती सदस्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या तज्ज्ञांना उपस्थित शालेय विद्यार्थिनी व तरुणींनी विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.


या कार्यशाळेत स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/3.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.