असा होता आठवडा (दि. ५ जानेवारी ते ११ जानेवारी २०२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतगेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा
 गोषवारा (न्यूज डायजेस्ट)दि.5 जानेवारी 2020
· द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने मुंबई येथे आयोजित कार्पोरेट कंपनी सचिवांच्या परिषदेची उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता. कार्पोरेट कंपन्यांनी लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमांतून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे संबंधिताना आवाहन.
·     राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई उपस्थित. इतर मागास वर्ग, भटके विमुक्त समाजाचे प्रश्न राज्य शासन मार्गी लावण्याचे श्री.देसाई यांचे सुतोवाच.
·      पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा. राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार-माध्यमांचे योगदान महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त.
·  उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा; व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची लढाई एकत्रित लढण्याचे आवाहन.
मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर 1) श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय/खाती 2) श्री. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री - वित्त, नियोजन, 3) श्री.सुभाष राजाराम देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा, 4) श्री.अशोक शंकरराव चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 5) श्री.छगन चंद्रकांत भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, 6) श्री. दिलीप दत्तात्रय वळसे - पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क 7) श्री. जयंत राजाराम पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 8) श्री. नवाब  मोहम्मद इस्लाम मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता, 9) श्री. अनिल वसंतराव देशमुख - गृह, 10) श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात - महसूल, 11) श्री. राजेंद्र भास्करराव शिंगणे - अन्न व औषध प्रशासन, 12) श्री. राजेश अंकुशराव टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, 13) श्री. हसन मियालाल मुश्रीफ - ग्राम विकास, 14) डॉ. नितीन काशिनाथ राऊत - ऊर्जा 15) श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड - शालेय शिक्षण, 16) डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड –गृहनिर्माण, 17) श्री. एकनाथ संभाजी शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), 18) श्री. सुनिल छत्रपाल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण 19) श्री. विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन 20) श्री. अमित विलासराव देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य 21) श्री. उदय रविंद्र सामंत - उच्च व तंत्र शिक्षण 22) श्री. दादाजी दगडू भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण 23) श्री. संजय दुलिचंद राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 24) श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता 25) ॲड. के. सी. पाडवी - आदिवासी विकास 26) श्री. संदिपानराव आसाराम भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन 27) श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील - सहकार, पणन 28) ॲड. अनिल दत्तात्रय परब - परिवहन, संसदीय कार्य 29) श्री. अस्लम रमजान अली शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास 30) ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) - महिला व बालविकास 31) श्री. शंकराराव यशवंतराव गडाख - मृद व जलसंधारण 32) श्री. धनंजन पंडितराव मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 33) श्री. आदित्य उद्धव ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार.
राज्यमंत्री - 1) श्री. अब्दुल नबी सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य 2) श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण 3) श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन 4) श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू -जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार 5) श्री. दत्तात्रय विठोबा भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन 6) डॉ. विश्वजीत पतंगराव कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा 7) श्री. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य 8) श्री. संजय बाबुराव बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य 9) श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे - नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 10) श्रीमती आदिती सुनील तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क.
000

6 जानेवारी 2020

·  माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे दादर शिवाजी पार्क येथील माँसाहेबांच्या स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
·  मराठी भाषा विभागामार्फत मंत्रालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
·      अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून विभागांचा आढावा.
·  धापेवाडा टप्पा-2 आणि 3 आणि गोसीखुर्द प्रकल्प पुनर्वसन संदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक. धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन 2019-20 मध्ये 50 कोटी रुपये देणार.
· फेडरेशन ऑफ इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (‘फेकाम’) यांच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक.
· पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात गतीमानता येण्यासाठी सां‍घिक भावनेने काम करण्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण विभागाच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. सागरकिनारा अधिनियमनांच्या अनुषंगाने कांदळवनांचे संरक्षण. प्लास्टिक कचऱ्याचे नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, ध्वनी प्रदूषण नियंत्रणांतर्गत विभागीय क्षेत्र निश्चिती आराखडा, जल प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापन याविषयावर बैठकीत चर्चा.
·  सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्री. मुंडे यांचे अभिवादन. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळास भेट देउन बाळासाहेबांना अभिवादन केले. स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे जयंतीदिनी दर्शन घेत त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
· विधानपरिषद निवडणूक 2020 साठी मंत्रालयात, दि. 7 जानेवारीपासून 6 फेब्रुवारी, 2020 पर्यंत कक्ष क्र. 611, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32 येथे नियंत्रण कक्ष सुरु.
·   कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांच्याद्वारे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा.
· महाराष्ट्रातील गड - किल्ल्यांवर आधारित फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा; 8 ते 22 जानेवारी दरम्यान समाज माध्यमांवर स्पर्धेचे आयोजन. स्पर्धकांनी त्यांचे फोटो, व्हिडिओ #MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह पोस्ट करणे आवश्यक. पर्यटन विभागाचे @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्याच्या सूचना.
·   पुढील वर्षी जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे, मुंबई शहर कौशल्य विकास विभागमार्फत आवाहन. संपर्क : https://worldskillsindia.co.in/worldskill/index.php 
· सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची माहिती देणारे त्रैमासिक ‘इ आर 1’ विवरणपत्र, 30 जानेवारीपर्यंत www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत आवाहन.
·  सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. अशोक चव्हाण यांच्यामार्फत विभागाचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा. रस्त्यांचा दर्जा राखा. रस्त्यांच्या निर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. महामार्गाबरोबरच शहरांमधील विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची कामे सुरु करा. वारंवार खराब होणारे रस्ते सिमेंट काँक्रिटने बनवा. पथकरातून रस्त्यांची कामे करताना त्या रस्त्यावर येणाऱ्या गावांतील रस्त्यांच्या कामाचा समावेश करा.
· सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांचे पत्रकार दिनानिमित्त मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
·  विधानपरिषद सभापती श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टेंभू उपसा सिंचन योजना, विसापूर उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना, राधानगरी, दुधगंगा, वारणा आणि तुळशी प्रकल्प, कण्हेर, उरमोडी प्रकल्प आणि धोम आणि धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालवा समित्यांची बैठक संपन्न. टंचाई काळातील सिंचन पाणीपुरवठा प्रकल्पाच्या थकित वीज देयकाची रक्कम तत्काळ अदा करण्याचे श्री.पाटील यांचे निर्देश.
· ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर रायकर यांना मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
· पनवेल तालुक्यातील, बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने फसवणूक केल्याचा आरोप करीत आंदोलन करणाऱ्या महेंद्र देशमुख या शेतकऱ्याची कैफियत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ऐकून घेतली. या कर्ज प्रकरणाबाबत आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश.
·  सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या विविध योजनांचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश - विविध योजनांचा लाभ वंचित घटकातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवा. योजनांविषयी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडा. भविष्यात इतर विभागांपेक्षा सर्वात सक्रिय विभाग अशी ओळख निर्माण करा.
·  मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार असल्याची मुंबई मंत्रालय वार्ताहर संघाच्यावतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न; शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्याचे श्री.देसाई यांचे सुतोवाच.

दि. 7 जानेवारी 2020
·  मंत्रिमंडळ निर्णय : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय.
·  बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडवान्स्ड स्टडी, शिमला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया’ : द रोड अहेड, या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे, राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. स्वायत्त महाविद्यालयांच्या माध्यमातून आदर्श संस्कार विद्यार्थ्यांना मिळतील यादृष्टीने प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन.
· कृषी मंत्री पदाचा कार्यभार मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी स्वीकारला. अधिकाऱ्यांसमवेत 'कृषी व्हिजनबाबत बैठक. कृषी विभागातील योजनांचे संलग्नीकरण करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल या दृष्टीने योजना राबविण्याचे सुतोवाच.
·      माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री श्री.दादाजी भुसे यांची आढावा बैठक. माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत जवानांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्याने घर देण्याची अधिकाऱ्यांना सूचना. आजी-माजी सैनिकांच्या घरांना घरपट्टीतून सूट देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे संबंधिताना निर्देश.
·  तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत वित्तमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना करण्याचे आणि मराठी भाषेत हेल्पलाइन सुरु करण्याचे सुतोवाच.
· ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागातील विविध योजनांचे सादरीकरण. मंत्री महोदयांचे निर्देश - समुद्रलाटांपासून वीज निर्मितीचा विचार करा. पर्यायाची तपासणी करण्यासाठी आयआयटी चेन्नईची मदत घ्या. वीज दर कमी कसे होतील याकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. वीजग्राहकांच्या वादासंदर्भातील न्यायनिवाड्याची कार्यपद्धती गतीमान करा.
·  राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार या विभागांचा कार्यभार स्वीकारला.
·      मंत्री श्री.अनिल परब यांच्यामार्फत परिवहन आणि संसदीय कार्य या विभागांचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक. सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण भागातील जनतेला चांगली वाहतूक सेवा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश.
· भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाच्या चित्रांनी सुशोभित मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसची विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्यामार्फत पाहणी.
·      राज्य कला प्रदर्शनाचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. कला संस्कृती जपण्यासाठी नव्या कलाकारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन.
·   महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे अभिनंदन.
·   मंत्री महोदयांचे निर्देश - 1. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्यावतीने कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक.2. कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीसाठी समिती स्थापन करा. अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश असणारे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा. रोजगार निर्मितीवर भर द्या.
· केमोथेरपीच्या सुविधेचा विस्तार सर्व जिल्हा रुग्णालयात करण्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्याकडून घोषणा. आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश - आरोग्यसेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी मिशन मोडवर काम करा; उपलब्ध सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा द्या.
·  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरविण्याबाबत तसेच 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसित गावठाणांना नागरी सुविधा देण्याबाबत वने, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. संजय राठोड यांच्याकडून आढावा. नैसर्गिक आपत्तीबाधीत गावांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष धोरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे संबंधिताना निर्देश.
·  सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योजकांसमवेत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचा संवाद. महत्त्वाचे मुद्दे -  सरकार कुठल्याही विकासकामांना स्थगिती देणार नाही; महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे नियोजन. शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांकडून योगदान अपेक्षित. एकही उद्योग बाहेर जाणार नाही याची विशेष काळजी. जमिनीची किंमत, वीज दर, रस्ते व इतर पायाभूत सुविधांची परिस्थिती आणि विविध परवानग्या गतीने मिळण्यासाठी उद्योग विभाग तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश. मुंबईसह संपूर्ण राज्यात पर्यटनाला गती देण्यात येऊन शहरांची चांगली ओळख निर्माण करणार. टेलिमेडिसिनसारख्या यंत्रणेच्या उपयोगातून दुर्गम भागामध्ये चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी उद्योजकांची मदत अपेक्षित.

दि. 8 जानेवारी 2020
· समाजसुधारकांच्या विचारानुसार वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे विधिमंडळ विशेष अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन.
·  अभिभाषणातील मुद्दे - अमरावती व नागपूर येथे आदिवासी युवकांसाठी क्रीडा अकादमी. महिला सुरक्षेसाठी कायद्यात सुधारणा. महाराष्ट्र निर्मितीच्या 60 वर्षेनिमित्त विशेष कार्यक्रम. मराठी भाषिकांच्या हक्कांचे संरक्षण. रंगभूमी चळवळीचे संग्रहालय, तीर्थस्थळाला जाणाऱ्या पदयात्रींसाठी सुविधा.
·    अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या आरक्षणाला मुदतवाढ देणाऱ्या संविधान सुधारणा विधेयकास समर्थन देण्याचा ठराव एकमताने विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर.
· श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांसाठी 51 लाख रुपयांची मदत; मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द.
· स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आवाहन. संपर्क www.maharashtra.gov.in आणि साहित्य आणि संस्कृती मंडळाचे संकेतस्थळ http://sahitya.marathi.gov.in
·      श्री सिद्धिविनायक न्यासाकडून मुंबई पोलीस रुग्णालयास दीड कोटी रुपये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द.
·      सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला.
·  सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावातील कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांचे निर्देश.
·      राज्य पोलीस मुख्यालय येथे पोलीस वर्धापन दिन, महाधिवक्ता श्री. आशुतोष कुंभकोणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. समाजमाध्यमांच्या विधायक वापराने व्यापक समाजहित साधण्याचे श्री. कुंभकोणी यांचे आवाहन.
·  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशेसोळावा पदवीदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न.
·      पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर :    पुणे- श्री. अजित अनंतराव पवार,   मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख,   मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे,   ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे,  रायगड - कुमारी आदिती सुनिल तटकरे,  रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब, सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत, पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे,  नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार, नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी,  जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील, अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ, सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील,  सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील,  सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील,  कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात,  औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई,  जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे, परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक,  हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड, बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे,  नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण, उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख, लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख, अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे), अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई,  बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे,  यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड,  नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत,  वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार, भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील,  गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख, चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार,  गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे.
·      एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 9 वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
दि. 9 जानेवारी 2020
·  मंत्री सुनील केदार यांनी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण विभागाचा कार्यभार स्वीकारला.
·      राज्याच्या महसूलवाढीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या उप‍स्थितीत आढावा बैठक. मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची जोडणी संगणकीकृत यंत्रणेद्वारे करुन उत्पादन शुल्क विभागाने करचोरीला आळा घालण्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचे निर्देश.
·  राज्यातील मालमत्तांच्या खरेदीविक्री व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात वाढ न करता रेडिरेकनरच्या दरात व्यावहारिकता, सुसूत्रता, तर्कसंगतता आणून महसूलवाढ करण्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचे निर्देश. मुद्रांक नोंदणी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्यासाठी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र संवर्ग आणि रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय.
· महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधीसमवेत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची बैठक. काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देणे आणि काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याचे सुतोवाच.
·      मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्याद्वारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आढावा शिवभोजन योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी 2020 रोजी करण्याची माहिती. योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात व 1वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयाला देण्यात येणार.
· मंत्री श्री.सुनील केदार यांच्याद्वारे पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाची आढावा बैठक: मंत्री महोदयांचे निर्देश : दूध, मांस, लोकर, अंडी यांच्या उत्पादन वाढीस प्राधान्य द्या; फिरते पशू चिकित्सालय सुरु करा; पुणे येथे विषाणू व कुक्कुट लस निर्मिती प्रयोगशाळा त्वरीत कार्यान्वित करा.
·  वरळी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे माणदेशी महोत्सवाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन.
·    मंत्री श्री.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक.
मंत्री महोदयांचे निर्देश : ग्रंथालयांची नव्याने पडताळणी करा; उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या रिकाम्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटवा; 30 वर्षे पूर्ण झालेली महाविद्यालये आणि वसतीगृहे यांच्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करा; विद्यापीठांनी रिक्त पदाचा अहवाल त्वरीत सादर करावा; तासिका, परीक्षा निकाल यांचे नियोजन करुन वेळापत्रक जाहीर करा; वेळेवर निकाल लावा.
·  गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात पत्रकार परिषद; एजाज लकडावाला याला अटक झाल्याची माहिती दिली. कोरेगांव भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच बैठक. 'फ्री कश्मिर' हा फलक हाती घेतलेल्या, महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हेतूचा उद्देश काय होता, याचा तपास सुरु; न्यायमूर्ती लेखा प्रकरणी सविस्तर माहिती घेऊन निर्णय; डीआयजी निशिकांत मोरे यांच्या निलंबनाचा निर्णय.
· माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2020. संपर्क : संबंधित जिल्हा माहिती कार्यालय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
·      औरंगाबाद येथे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याद्वारे औरंगाबाद शहराच्या विविध विकासकामांचा आढावा. शहरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आणि स्मार्ट शहर उपक्रमासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांची देखभाल, रस्ते दुरुस्तीसाठी महानगरपालिका व एमआयडीसीने समन्वयाने प्रश्न मार्गी लावण्याची सूचना. शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन.
·   औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी  प्रश्नांबाबत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा. औरंगाबाद  जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक बाबी प्राधान्याने पूर्ण  करण्याची ग्वाही. सिल्लोड पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पूर्णा नदीवरील अतिरिक्त बॅरेजेसबाबत सर्वेक्षण, पीक ‍विमा योजनेबाबत उणिवा दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक. मराठवाडा विभागातील शाळांच्या दुरूस्तीसाठी अंदाजे एक हजार 300 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्याने देणार. शाळांचा विकास करण्यासाठी उद्योजकांच्या सहकार्यातून विकास. औरंगाबाद- शिर्डी आणि औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या कामांना गती देणार. औरंगाबादेतून जाणाऱ्या द्रुतगती मार्गाच्या आजूबाजूस  ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर उभारण्याचा विचार. पैठण येथील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आणून पर्यटक, भाविकांसाठी खुले करणार, दौलताबाद टी पॉइंटजवळील बायपास रस्ता, औरंगाबादेत प्रस्तावित 200 खाटांचे  महिला व बाल रुग्णालय याबाबतही शासन सकारात्मक.
· मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्ह्यातील विकास कामांचा आणि समस्यांचा आढावा. परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करणार, रिक्त पदे एक महिन्यात भरणे; परभणी जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी; साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी; वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासून त्यात सुधारणा; परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा; परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठी गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पूर्ण करणार; येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करुन देणार; नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करुन देणार; शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याची सूचना.
·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याद्वारे उस्मानाबाबद जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : वीज जोडणीसाठी नोंदणी पोर्टल सातत्याने सुरू ठेवा; सौर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांची संख्या वाढवा; ट्रान्सफॉर्मर सुरू राहण्यासाठी ऑईलचा पुरेसा पुरवठा करा; 'महावितरण आपल्या दारी' ही योजना प्रभावीपणे राबवा; जुन्या ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करा; ग्रामीण भागांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करा, जिल्ह्यातील विकासकामांचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम ठरवा;
· नांदेड जिल्ह्यातील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी पूल बांधण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. भोकर, धर्माबाद, उमरी व भेंडेगावमधील रेल्वे उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करण्याचे श्री.चव्हाण यांचे निर्देश.
·   महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. बचतगट चळवळीद्वारे महिला सक्षमीकरण करण्याचे आणि बालगृह, अनाथ मुले, बालकल्याणासाठी नवीन योजना आणण्याचे सुतोवाच.
·  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यात मिळणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती.
· महाराष्ट्र पर्यटन आणि इंडियन हेरीटेज सोसायटी (मुंबई) यांच्यावतीने ‘मुंबई संस्कृती’ या शास्त्रीय, नृत्य व संगीत महोत्सवाचे दि. 11 व 12 जानेवारी, 2020 रोजी आयोजन.
·   सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार विभागाच्या 'ना देय प्रमाणपत्रा'साठी मुंबईत 'एक खिडकी' यंत्रणा तत्काळ सुरु.
·  औरंगाबाद येथे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ) यांच्याव्दारे आयोजित 'ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो' या औद्योगिक प्रदर्शनाचे, मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. महत्त्वाचे मुद्दे - उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य; बीडकीन येथे 500 एकर जमिनीवर अन्न प्रक्रिया केंद्र, या केंद्रात 100 एकर महिलांसाठी राखीव, कौशल्य विकास केंद्राची स्थापना.
·  वनविभागाच्या विविध विकास कामांचा वनमंत्री श्री. संजय राठोड यांच्याद्वारे आढावा.
·   मंत्री महोदयांचे निर्देश - वनविभाग अधिक लोकाभिमुख करा; वनपर्यटनाला चालना द्या;  संरक्षित गावातील पुनर्वसन लवकर करा;  पुनर्वासित गावांना तातडीने मुलभूत सुविधा पुरवा;  वाघाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॉरिडॉर तयार करा;


दि. 10 जानेवारी 2020
·  सेबी, बाँम्बे स्टाँक एक्स्चेंज, बीएसई आणि महाराष्ट्र सायबर यांच्यावतीने 'सायबर सिक्युरिटी कान्फरन्स - 2020' परिषदेचे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे (सेबी) सदस्य श्री.एस.के.मोहंती यांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी 'सायबर सुरक्षा' महत्त्वाचा मुद्दा असल्याचे श्री. मोहंती यांचे प्रतिपादन.
·      सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने विश्व हिंदी दिवसानिमित्त, 9 वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांचय प्रमुख उपस्थितीत संपन्न. देशातील विभिन्न संस्कृतीला एकत्रित ठेवणारी भाषा-हिंदी असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन.
·  औरंगाबाद येथे एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची, मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात निरनिराळ्या पक्षांच्या अधिवासाच्या पुरक वृक्षांची लागवड करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·  कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा. कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची श्री. सामंत यांच्याकडून सुतोवाच. समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश. पैठण येथे विद्यापीठ निर्मितीसाठी समिती गठन करण्याच्या सूचना.
· लातूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि समस्यांचा मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा. महत्त्वाचे मुद्दे: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला जाईल, रोजगार हमी योजनेत अधिक पारदर्शकता आणली जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दूध संकलन अंतर्गत दूध भुकटी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. पाझर तलाव निधी, कृष्णा खोरे, संदर्भात कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अहवाल महाराष्ट्र जल परिषदेकडे पाठवण्यात येईल. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील. देवणी या ठिकाणी गाईचे आंतरराष्ट्रीय पशु संशोधन केंद्रामार्फत दर्जेदार देवणी गायीच्या वाण संवर्धनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. विमा कंपन्यासोबत समन्वय साधून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. गायरान जमिनीचा वापर एमआयडीसीसाठी करण्यात येईल.
· विश्व हिंदी भाषा दिनानिमीत्त हिंदी पत्रकार संघाने मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे बॉलीवुड आणि हिंदी” या विषयावरील परिसंवादाला  राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती.
·  राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांनी जनतेला प्राथमिक ऊर्जा पुरवठा करण्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तयार करण्यात आलेल्या ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी-2019’ मध्ये महाराष्ट्र  ठरले अग्रेसर.
·  राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या फिजिओथेरपिस्ट सोसायटीच्याऑफ इंडिया या संस्थेच्या 5 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन.
·     महिला व बालविकास विभागा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांच्याद्वारे विभागाच्या कामांचा आढावा. महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा विभागीय स्तरावर आढावा घेणार असल्याचे श्रीमती ठाकूर सुतोवाच.
·    उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते, अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे नागपूर येथे उद्घाटन. 111 संस्कृत पुस्तकांचे डिजिटल प्रकाशन.

11 जानेवारी 2020
·      दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम यावरील कार्यशाळा संपन्न.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.