अनिल गोंडाणे यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची मोठी हानी- सुभाष देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : माजी विधानपरिषद सदस्य अनिल गोंडाणे यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात मंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आज विधानपरिषदेत दिवंगत अनिल गोंडाणे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

श्री. देसाई यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्तावावर  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई गिरकर, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, शरद रणपिसे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.