मा.मंत्री श्री. छगन चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नाव              :    श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
जन्म                     :      15 ऑक्टोबर 1947.
जन्म ठिकाण          :      नाशिक.
शिक्षण                  :      एल.एम..(आय).
ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी इंग्रजी.
वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती मीना.
अपत्ये                   :      एकूण 1 (एक मुलगा).
व्यवसाय                :      शेती.
पक्ष                       :      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मतदारसंघ             :      119-येवला, जिल्हा नाशिक.
इतर माहिती           :      संस्थापक अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई माजी विश्वस्त, व्ही. जे. टी. आय. संस्था, मंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा आदर्शाचा प्रचार प्रसारः माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट : 1985 "देवत" 1990" नवरा बायको' या मराठी चित्रपटांची निर्मिती; 1973 सदस्य, 1973-84 विरोधी पक्षनेते, 1985 1991 महापौर, मुंबई महानगरपालिकाः 1991 अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स; 1991 पर्यंत शिवसेनेत, 1991 नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत, जून 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य संस्थापक सदस्य जून 1999 ते नोव्हेंबर 1999 महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः 1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-19 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.

1996-2002 2002-2004 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; डिसेंबर 1991 ते मार्च 1993 महसूल खात्याचे मंत्री; मार्च 1993 ते मार्च 1995 गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; 1996 - 1999 विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद; ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृह आणि पर्यटन मंत्री, जानेवारी 2003 ते डिसेंबर 2003 उपमुख्यमंत्री गृह मंत्री; नोव्हेंबर 2004 ते ऑक्टोबर 2009 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.