उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी केले 'लोकराज्य'चे सामूहिक वाचन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतउस्मानाबाद :-  "एकाच दिवशी एकाच वेळी" ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 या वेळेत शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकातील पंडित नेहरू यांच्यावरील लेखाचे सामूहिक वाचन हा उपक्रम राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये लोकराज्यचे सामूहिक वाचन संपन्न झाले. जवळपास 1 हजार 885 शाळा-महाविद्यालयातील जवळपास 10 हजार शिक्षक आणि 3 लाख  विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन केले.गुगल फॉर्मच्या माध्यमातून संकलित होणारी अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येईल.

मागील वर्षीही दि.1 सप्टेंबर 2018 रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता.त्यावेळी एकूण 1 लाख 26 हजार 229 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून लोकराज्य मासिकाचे एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन केले होते.या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमासाठी औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे माहिती व जनसंपर्क चे उपसंचालक यशवंत भंडारे, शिक्षणाधिकारी सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्‍तात्रय थेटे, विस्ताराधिकारी संतोष माळी, विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड , विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे,  अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव, पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन., इंगळे वाय .के., श्रीमती गुंड,  े.पी. पाटील आणि तीन हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.