ग्रंथालय विकासनिधीसाठी ११ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 18 : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेचा लाभ घेण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयांनी 11 डिसेंबर 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी केले आहे.

सन 2019-20 पासून असमान निधी योजनांसाठीचे विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे असून याबाबतची सविस्तर माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे.

पात्र शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आवश्यक असलेला असमान निधी योजनेचा प्रस्ताव संकेतस्थळावरुन उपलब्ध (डाऊनलोड) करुन ऑनलाईन पद्धतीने 7 डिसेंबरपर्यंत अपलोड करावा. तसेच अर्जाच्या प्रतीसोबत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 11 डिसेंबरपर्यंत सादर करावेत. यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज हा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत भरावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक, मुंबई यांनी केले आहे.

असमान निधी योजनेचे लाभ :

ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी अर्थसहाय्य, ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य असे लाभ असमान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना घेता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.