मा.मंत्री श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब थोरात यांचा परिचय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनाव         :  श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
जन्म             :   7 फेब्रुवारी, 1953
जन्म ठिकाण   :      जोर्वे, तालुका-संगमनेर, जिल्हा अहमदनगर.
शिक्षण                  :      बी.. एल.एल.बी.
ज्ञात भाषा              :      मराठी, हिंदी इंग्रजी.
वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती कांचन.
अपत्ये                   :      एकूण 4 (एक मुलगा तीन मुली)
व्यवसाय                    शेती.
पक्ष                       :      भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय).
मतदारसंघ             :      217- संगमनेर, जिल्हा अहमदनगर.
इतर माहिती           :      विद्यार्थी जीवनात पुणे येथे फर्ग्युसन विधी महाविद्यालयात असताना पाणी पंचायत चळवळीत सहभाग; 1980 विडी कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नऊ दिवस कारावास; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत सक्रीय सहभाग; विश्वस्त, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्था, अमृत वाहिनी शेती शिक्षण संस्था, संगमनेर : 1980 संस्थापक, अमृत वाहिनी व्यावसायिक सहकारी दूध संस्था; 1980 संचालक 1988-93 चेअरमन, संगमनेर तालुका दुध उत्पादक सहकारी संघ, घुलेवाडी; संगमनेर तालूक्यात दुध उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न, संगमनेर तालुक्याच्या शेक्षणिक विकासात सहभाग, भंडारदरा धरणामध्ये असलेल्या पाण्याचे शेतीसाठी फेरवाटप व्हावे यासाठी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व फेरवाटप करून घेण्यात यशस्वी, निळवंडे धरणाचे कामे पूर्ण व्हावे यासाठी चळवळ उभी केली; 1989 संचालक 1993 - 2001 चेअरमन, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर; 1989 अध्यक्ष, राज्य विडी कामगार किमान वेतन समिती, अहवाल शासनास सादर करून महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतन वाढीची शिफारस केली; दुष्काळग्रस्तांसाठी मदतकार्य; निळवंडे धरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी चळवळ उभी केली; संस्थापक अध्यक्ष, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन; 1993-99 संचालक, नॅशनल हेवी इजिनिअरींग सहकारी संस्था. संचालक, ऑल इंडिया डिस्टलरी असोसिएशन नवी दिल्ली; 1998-2000 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी; उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल 2008 मध्ये देशभक्त किसनवीर सामाजिक संस्थेच्या समाजकृतज्ञता" पुरस्कार, 2014 मध्ये यशवंत प्रतिष्ठान पुणे यांच्या कडुन "यशवंत-वेणू" पुरस्कार 2015 मध्ये माधवराव लिमये फाऊंडेशनचा "कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानीत; 1985-90, 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-14, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.

विधी मंडळाच्या रोजगार हमी, आश्वासन, सार्वजनिक उपक्रम पंचायत राज समित्यांचे सदस्य म्हणून काम केले; ऑक्टोबर, 1999 ते जुलै, 2004 पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, 2004 ते ऑक्टोबर, 2009 जलसंधारण आणि खारजमीन खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, 2009 ते नोव्हेंबर, 2010 कृषी जलसंधारण, रोजगार हमीयोजना आणि शालेय शिक्षण (अतिरिक्त कार्यभार) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, 2010 ते सप्टेंबर, 2014 महसूल खार जमिनी खात्याचे मंत्री; राज्यभर शेततळ्यांची निर्मिती, सुवर्ण जयंती राजस्व अभियान सरू केले, खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप; महसूल खात्याचा कारभार ऑनलाईन करण्यात पुढाकार; राज्यातील शेत जमिनीचे नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतला; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.