राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ऑक्टोबर : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी अमेरिकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिन्सन हे शिष्टमंडळासह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
विधानभवन

विधानभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, उपसचिव ऋतूराज कुरतडकर, सभापतींचे सचिव महेंद्र काज, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रवींद्र जगदाळे, अवर सचिव सुनील झोरे आदी उपस्थित होते.
वर्षा निवासस्थान

राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.नवी दिल्ली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी  प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी येथील सांगली मेस वस्तीमध्ये जागरूकता अभियानही राबविण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांना सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग टाळण्याबाबत शपथ दिली. यावेळी, उपसंचालक श्री. कांबळे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले.सिंगल प्लास्टिक यूजला गुडबायकरण्याचा संदेश

तत्पूर्वी, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील सांगली मेस वसतीमध्ये सिंगल प्लास्टिक यूज टाळण्यासाठी जागरूकता अभियाही राबविण्यात आले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. सांगली मेस वस्तीच्या प्रत्येक घरात जावून त्यांना यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि सिंगल प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.