मुंबई
दि. 16: राज्यातील अल्पसंख्याक समूहातील उमेदवारांकरिता विविध स्पर्धा परीक्षा, सामाईक
प्रवेश परीक्षा आणि इयत्ता दहावी
बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीसाठी मोफत प्रशिक्षण
देण्याकरिता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना अल्पसंख्याक विकास
विभागामार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली
आहे.
या
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी निवड केलेल्या संस्थेकडे आवश्यक
कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सन 2019-20 करिता मुंबई शहर
जिल्ह्यातील प्रबोधन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, एम.टी.एज्युकेअर लिमिटेड,
सिद्दीकी एज्यूकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट या संस्थांची
अभ्यासक्रमनिहाय निवड करण्यात आली आहे.
राज्यातील
अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत रोजगारांच्या पुरेशा
संधी उपलब्ध करून देणे. केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिंग
सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील
प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी
प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता 10वी 12वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक
उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या
योजनेबाबत अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय सेथे संपर्क साधावा,
असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा