नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांची मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 17 : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. त्यांच्या पाच दिवसीय भारत भेटीतील हा एक भाग होता. भारत व नेदरलँड यांच्यातील भूतकालीन, वर्तमान व भविष्यकालीन मैत्रीचे प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाला डच राष्ट्रीय रंग असलेल्या भगव्या दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आले. त्याचबरोबर डच राष्ट्रीय फूल- ट्युलिपने या परिसरात सजावट करण्यात आली. स्थानिक इतिहासकार सिमीन पटेल यांनी शाही दांपत्याला स्मारकाची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.