नवलेवाडी येथील मतदान प्रक्रिया सुरळित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसातारा, दि.22 : विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 250 नवलेवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथे 45 सातारा लोकसभा पोटनिवडणूक व 257 कोरेगांव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता मतदान प्रक्रियेबाबत बातमी प्रसिद्ध झाली. दिनांक 21 / 10 / 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता उमेदवार प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार (एनसीपी) व दिलीप आनंदराव वाघ (एनसीपी) हे अभिरुप मतदानावेळी उपस्थित होते, अभिरूप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. किंबहुना सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. दीपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरुन देणेबाबत सांगितले तथापी त्यांनी तसे करण्यास नकार दिला. तद्नंतर सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.

सदर तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच अशी कोणतीही घटना घडलेली नाही. असे कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी 257-कोरेगांव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, कोरेगांव यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.